बाबासाहेबांच्या लंडनमधील आठवणींना ऑनलाइन प्रदर्शनात उजाळा, पाहा दुर्मिळ फोटो

Dr.Bababsaheb Ambedkar Photo Exibition : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. बाबासाहेबांच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील (LSE) आठवणींचं ऑनलाइन प्रदर्शन सर्वांना पाहता येणार आहे. यामध्ये तुम्हाला आणि आठवणी वाचता येतील. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील प्रवेश अर्जापासून ते पत्र आणि फोटो असं सगळं या प्रदर्शनात पाहता येणार आहे. बातमीखाली या ऑनलाइन प्रदर्शनाची लिंक देण्यात आली आहे. त्यावर जाऊन तुम्ही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये विद्यार्थीदशेत प्रवेश घेणारे बाबासाहेब, त्यावेळचे त्यांचे शिक्षक, सोबतचा मित्रपरिवार यांचे फोटो आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती वाचू शकता. हे ऑनलाइन प्रदर्शन लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE)दक्षिण आशिया केंद्र, LSE ग्रंथालय आणि डेकोलोनिझिंग LSE यांच्या माध्यमातून भरविण्यात आले आहे. सर्वात पहिल्यांदा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये विद्यार्थी असताना बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या पत्रव्यवहारापासून पुढील काळात LSE सोबत साधलेला पत्रांचे डॉक्यूमेंटेशन करण्यात आले आहे. भविष्यात या संदर्भातील कार्यक्रम, वाचन, पॉडकास्ट आणि इतर माध्यमातून आंबेडकरांनी LSE ला दिलेल्या योगदानाचे प्रकाशन केले जाणार असल्याचे राजकीय आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासक डॅनियल पायन यांनी सांगितले. या प्रदर्शनासाठी डॉ. निलंजन सरकार (LSE दक्षिण आशिया केंद्र), डॉ जयराज सुंदरेसन (LSE भूगोल), अ‍ॅंडी जॅक (LSE ग्रंथालय वेब संपादक) आणि स्यू डोनेली (सेवानिवृत्त शालेय आर्काइव्हिस्ट) यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. https://ift.tt/3ylzDcz या संकेतस्थळावर हे प्रदर्शन पाहता येणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jCsJeU
via IFTTT

Post a Comment

0 Comments