नोकरी करता करता MBA! 'या' विद्यापीठातून शिकता येणार

Executive Admission 2021: शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये एक्झिक्युटिव्ह एमबीए अभ्यासक्रमाची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. भारतीय व्यवस्थापन संस्था, जम्मू (IIM Jammu) ने वर्किंग प्रोफेशनल्ससाठी दोन वर्षीय एक्झिक्युटिव्ह एमबीए किंवा मास्टर ऑफ बिजनेस अॅडमिनिस्ट्रेशन (ईएमबीए) कोर्स लाँच केला आहे. कोणत्याही कारणाने आपले उच्च शिक्षण, विशेषत: मॅनेजमेंट मधील शिक्षण पूर्ण करता आलेले नाही आणि आता नोकरी करता करता एमबीए पूर्ण करायचे आहे, अशा उमेदवारांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे. कोणत्याही कॉर्पोरेट, उद्योग, सरकारी विभाग, आर्म्ड किंवा पॅरामिलिट्री फोर्स, एनजीओमध्ये काम करणाऱ्या प्रोफेशनल किंवा आंत्रप्रिनरला (कमीत कमी तीन वर्ष नोकरीचा अनुभव आवश्यक) या आयआयएम, जम्मूच्या एक्झिक्युटिव्ह एमबीए कोर्स मध्ये प्रवेश मिळेल. आयआयएम जम्मूच्या एक्झिक्युटिव्ह एमबीए कोर्समध्ये शैक्षणिक सत्र २०२१-२२ या वर्षात प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांना संस्थेची अधिकृत वेबसाइट, iimj.ac.in वर उपलब्ध केलेल्या ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करता येईल. अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि उमेदवारांना ऑनलाइन सबमिट केलेल्या अर्जाची हार्ड कॉपी स्पीड पोस्टद्वारे ३१ जुलै २०२१ पर्यंत पुढील पत्त्यावर जमा करायची आहे - अॅडमिशन ऑफिस (ईएमबीए प्रोग्राम), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जम्मू, ओल्ड यूनिवर्सिटी कॅम्पस, कॅनाल रोड, जम्मू – १८००१६. अभ्यासक्रमाविषयीच्या कोणत्याही माहितीसाठी किंवा अर्जातील मदतीसाठी उमेदवारा संस्थेचा हेल्पलाइन क्रमांक ०१९१- ३५१०३१५ वर कॉल करू शकतात किंवा emba.admissions@iimj.ac.in आणि chairpersonemba@iimj.ac.in वर ईमेल करू शकतात. अर्जाची पात्रता आयआयएम जम्मूच्या एक्झिक्युटिव्ह एमबीए कोर्ससाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५० टक्के गुणांसह पदवीधर असणे आवश्यक. एससी, एसटी, पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी पदवीच्या गुणांची मर्यादा ४५ टक्के आहे. प्रोफेशनल प्रोग्राम सीए, सीएस आणि आयसीडब्ल्यूए केलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ylzJkr
via IFTTT

Post a Comment

0 Comments