SSC GD Constable 2021: कर्मचारी निवड आयोगातर्फे नोटिफिकेश कधी जाहीर होणार? जाणून घ्या

SSC GD Constable 2021: एसएससी जीडी कॉंस्टेबल भरती परीक्षेचे नोटिफिकेशनची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. या आठवड्याच्या अखेरपर्यंत अधिकृत नोटिफिकेश जाहीर केले जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार १० जुलैपर्यंत नोटिफिकेशन जाहीर करणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईट https://ssc.nic.in/ वर अधिक माहिती मिळू शकते. याशिवाय दिल्ली पोलीस (Delhi Police) आणि सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स (CAPFs)मध्ये सब इन्स्पेक्टर (SI) आणि CISF मध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर (ASI) भरती परीक्षा २०२१९ पेपर-२ सहित एसएससी सीजीएल आणि एसएससी सीएचएसएल (SSC CHSL) भरती २०२० पेपर-१ परीक्षेचे रिवाइज्ड नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. दिल्ली पोलिस आणि सीएपीएफ (CAPFs) मध्ये सब इंस्पेक्टर आणि सीआयएसएफ (CISF)असिस्टेंट सब इस्पेक्टर परीक्षा (पेपर- II) २०१९ चे आयोजन २६ जुलै २०२१ ला विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे. याशिवाय कम्बाइंड ग्रॅज्युएट लेवल भरती परीक्षा ( Combined Graduate Level Examination (Tier-I)४ ते १२ ऑगस्ट २०२१ दरम्यान होणार आहे. एसएससी जीडी कॉंस्टेबल लॉगिन परीक्षेमध्ये सर्वात आधी कॉम्प्युटर बेस्ड लेखी परीक्षा होईल. लेखी परीक्षेत पास होणाऱ्या उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलावले जाईल. याशिवाय लेखी परीक्षेत जनरल इंटेलिजन्स, रिजनिंग, जनरल नॉलेज, जनरल अवेअरनेस, इलिमेंट्री मॅथ्स आणि इंग्रजी/हिंदी विषयासंदर्भात प्रश्न विचारले जातील. एसएससीच्या माध्यमातून विविध परीक्षांसदर्भातील माहितीसठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SLDIYn
via IFTTT

Post a Comment

0 Comments