Also visit www.atgnews.com
AAI Recruitment 2021: परीक्षा न देता एक लाख रुपयांच्या पगाराची नोकरी, जाणून घ्या डिटेल्स
Airport Authority Of India : जर तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर भारतीय विमानतळ प्राधिकरणाने तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आणली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे(airport authority of india) अनेक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना १ लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. तुम्ही नोकरीसाठी इच्छुक असाल तर भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकता. ३१ ऑगस्ट पर्यंत आलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे आजच अर्ज भरा आणि नोकरीची ही सुवर्ण संधी जाऊ देऊ नका. रिक्त पदांचा तपशिल वरिष्ठ सहायक (ऑपरेशन) - १४ पदे वरिष्ठ सहायक (वित्त) -६ पदे वरिष्ठ सहायक (इलेक्ट्रॉनिक्स) - ९ पदे अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. तसेच पात्रता तपासून घ्या आणि त्यानंतर अर्ज करा. वरिष्ठ सहायक (ऑपरेशन) या पदासाठी एलएमव्ही लायसन्ससह पदवीधर आणि व्यवस्थापनात डिप्लोमा असणे गरजेचे आहे. वरिष्ठ सहायक (वित्त) या पदासाठी बी.कॉम सह ३ ते ६ महिने शिकलेल्या संगणक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. तर वरिष्ठ सहायक (इलेक्ट्रॉनिक्स) या पदासाठी इलेक्ट्रॉनिक्स / दूरसंचार / रेडिओ इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा असणे गरजेचे आहे. या पदांवर किती मिळेल पगार ? वरिष्ठ सहायक (ऑपरेशन्स), वरिष्ठ सहायक (वित्त) आणि वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स) या तिनही पदांसाठी ३६ हजार ते १ लाख १० हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकेल. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने २९ जुलै रोजी हे नोटिफिकेशन जाहीर केले होते. तुम्हाला अर्ज करायचा असेल तर ३१ ऑगस्ट २०२१ ही शेवटची तारीख आहे. या पदांसाठी उमेदवारांची वयोमर्यादा ३० जून २०२१ पर्यंत ५० वर्षे असणे गरजेचे आहे. या अंतर्गत एकूण २९ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://ift.tt/2XaZRRx या लिंकवर क्लिक करून प्राधिकरणाने जारी केलेले अधिकृत नोटिफिकेशन वाचू शकता आणि नोकरीसाठी अर्ज करू शकता. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fW2AFd
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments