Also visit www.atgnews.com
CTET 2021: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे नोटिफिकेशन कधी? CBSE ने दिली माहिती
CTET 2021 Notification: देशातील शिक्षकांच्या पदांच्या भरतीसाठी होणाऱ्या अर्थात सीटीईटीसंदर्भात महत्त्वाची अपडेट आली आहे. यानुसार, असं म्हटलं जात आहे की सीबीएसई बोर्ड लवकरच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (CTET) 2021 नोटिफिकेशन जारी करू शकते. यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू होईल. मात्र सीबीएसई बोर्डाने हे स्पष्ट केलेले नाही की परीक्षेची अधिकृत अधिसूचना कधी जारी होणार आहे. पण बोर्डाकडून परीक्षेची टेंटेटिव डेट समोर आल्याने अशी शक्यता वर्तवली जात आहे की बोर्ड कधीही अर्ज भरण्याच्या तारखांची घोषणा करू शकते. मिडीया रिपोर्ट्स नुसार ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू केली जाईल. ही प्रक्रिया सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू राहू शकते. या व्यतिरिक्त ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षेसाठी करेक्शन विंडो उघडली जाईल. यानंतर डिसेंबर किंवा जानेवारीत परीक्षेचं आयोजन केलं जाईल. मात्र अद्याप बोर्डाकडून परीक्षेच्या तारखांसंदर्भात कोणतंही वेळापत्रक जारी करण्यात आलेलं नाही. इच्छुक उमेदवारांनी सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट ctet.nic.in ला भेट देऊन लेटेस्ट अपडेट चेक करत राहावे. अलीकडेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या (CTET) तात्पुरत्या तारखा सीबीएसई बोर्डाने जाहीर केल्या. यावेळी परीक्षेतील मोठ्या बदलांचीही माहिती दिली होती. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE)सांगितले होते की यावर्षी सीटीईटी 2021 परीक्षा ऑनलाइन पद्धतीने आयोजित केली जाईल. याव्यतिरिक्त परीक्षेचे पॅटर्नही बदललेले असेल. यंदा कोविड-१९ विषाणू महामारीमुळे सीटीईटी परीक्षेला विलंब झाला आहे. परीक्षेसंबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देत राहावी.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CJhhFp
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments