जेईई मेन २०२१ जुलै सत्र परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जारी

JEE Main 2021 Result: २०२१ जुलै सत्र परीक्षेचा निकाल आता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. जेईई मेन 2021 जुलै सत्र परीक्षेच्या निकालाची तारीख अद्याप नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जाहीर केलेली नाही. मात्र जुलै सत्र परीक्षेची अंतिम उत्तर तालिका जाहीर करण्यात आली आहे. फायनल आन्सर की गुरुवारी ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी उशिरा जारी करण्यात आली आहे. राज्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांव्यतिरिक्त देशभरातील उमेदवारांसाठी जेईई मेन परीक्षा २०,२२,२५ आणि २७ जुलैला आयोजित करण्यात आली होती. यानंतर एनटीएने ३ आणि ४ ऑगस्टला या विभागांमध्ये परीक्षा घेण्याची घोषणा केली. ही परीक्षा ४ ऑगस्टला संपली आहे. जेईई मेन जुलै सत्राची परीक्षा सुमारे ७.०९ लाख विद्यार्थ्यांनी दिली होती. ही परीक्षा संगणकीकृत (CBT)होती. देशभरात ३३४ शहरांमध्ये आणि ८२८ केंद्रांवर जेईई मेन परीक्षा आयोजित करण्यात आली होती. जेईई मेन 2021 AIR आणि जेईई अॅडव्हान्स्ड 2021 साठी अंतिम कट-ऑफ एनटीए स्कोर वर आधारित असेल. जेईई मेन जुलै सत्र परीक्षेच्या निकालानंतर कट ऑफ यादी जाहीर केली जाईल. जेईई मेनचे आयोजन आयआयआयटी, एनआयटी आणि अन्य संस्थांमधील प्रवेशांसाठी केले जाते. ही जेईई अॅडव्हान्स्ड, आयआयटी प्रवेश परीक्षांसाठी पात्रता परीक्षा देखील आहे. JEE Main Result कसा पाहाल? स्टेप १- सर्वात आधी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा. स्टेप २- "View Result/Scorecard" लिंक वर क्लिक करा. स्टेप ३- विचारलेली माहिती भरा. स्टेप ४- निकाल तुमच्या समोर असेल. स्टेप ५- आता हा निकाल डाउनलोड करा. स्टेप ६- भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट अवश्य घ्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yuRwpB
via IFTTT

Post a Comment

0 Comments