Also visit www.atgnews.com
मुंबई विद्यापीठातर्फे १७ ऑगस्टला जाहीर होणार पहिली मेरीट लिस्ट
Admissions 2021: मुंबई विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. विद्यापीठातर्फे यूजी प्रवेश २०२१ (पदवी) साठी पहिली मेरीट लिस्ट १७ ऑगस्टला जाहीर होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार १७ ऑगस्टला सकाळी ११ वाजता विद्यापीठाची अधिकृत वेबसाइट mu.ac.in वर यादी जाहीर करण्यात येईल. या यादीची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेबसाइटवर लक्ष ठेवावे लागणार आहे. महत्वाच्या तारखा एमयू प्रवेश २०२१ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख- १४ ऑगस्ट २०२१ यूजी प्रवेशासाठी पहिली मेरीट लिस्ट- १७ ऑगस्ट सकाळी ११ वाजता यूजी प्रवेशसाठी दुसरी मेरीट लिस्ट- २५ ऑगस्ट २०२१ यूजी प्रवेशासाठी तिसरी मेरीट लिस्ट- ३० ऑगस्ट २०२१ विद्यापीठातर्फे मिळालेल्या माहितीनुसार दुसरी आणि तिसरी मेरिट यादी लवकरच जाहीर होणार आहे. प्रवेश २०२१ साठी १४ ऑगस्ट २०२१ ही शेवटची तारीख आहे. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील ( click on-Mumbai University Pre Admission online Registration 2021-22) या लिंकवर क्लिक करावे. ऑनलाईन अर्ज कसा करावा- - विद्यार्थ्यांने स्वतःबद्दलची माहिती भरुन नोंदणी करणे - एकदा अचूक माहिती भरल्यावर दाखल केलेल्या मोबाईल क्रमांकावर युझर आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल. -युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त होताच विद्यार्थ्यांने सर्वप्रथम स्वतःबदलची माहितीची खातरजमा करुन पासवर्ड बदलण्याची मुभा देण्यात आली आहे. - विद्यार्थ्याला देण्यात आलेल्या युजरआयडी आणि पासवर्ड किवा बदलेल्या पासवर्डच्या मदतीने सर्वप्रथम स्वतःबद्दलची माहिती, शैक्षणिक गुणवत्ता, इ.माहिती भरावयाची आहे. - त्यानंतर स्कॅन केलेला अद्ययावत फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायची आहे. - Confirm Profile वर क्लिक करून माहितीची खातरजमा करता येईल. - ऑनलाईन प्रवेश नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये नमूद केलेले शिक्षणक्रम विद्यार्थ्याने निवडायचे आहेत. सोबतच विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालये त्यांनी निवडायचे आहेत. ऑनलाईन अर्ज भरताना खालील बाबींकडे लक्ष द्या- - प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी करण्यापूर्वी करुन माहिती पुस्तिकेनुसार विषय व विषयसमुहाप्रमाणेच (Combination) विषय निवडणे बंधनकारक असणार आहे. - प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी ही मल्टी कॉलेजेस, मल्टी कोर्स (प्रोग्राम) साठी करता येईल. - विद्यार्थ्यांने शिक्षणक्रम निहाय नोंदणी अर्जाची प्रत काढून ती संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या विहित प्रक्रियेसाठी योग्य त्या दस्ताऐवजासह सादर करावयाची आहेत. - विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिका सोबत ठेवाव्यात. - विद्यार्थ्यांच्या शिक्षणक्रमांचे विषय अंतिम करण्याचे अधिकार महाविद्यालयांच्या प्राचार्यांना असतील याची नोंद घ्यावी. - स्वायत्त महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेबाबतचे नियम व अधिकार हे विद्यापीठ व शिखर संस्थांच्या नियमास अधीन राहून महाविद्यालयांच्या प्रचलित नियमाप्रमाणे असतील. - प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी ही नमूद केलेल्या कालावधीत होणे गरजेचे आहे. - विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन प्रवेश नोंदणी अर्जाची प्रत असल्याशिवाय महाविद्यालयात तो प्रवेश घेऊ शकणार नाही.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CA6AEZ
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments