एमआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनवली चालकविरहित गाडी!

पुणे येथील विश्वशांती विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी चालकरहित विद्युत चारचाकी वाहन तयार केले आहे. मागील दशकात वाहन उद्योगात भरपूर वाढ झाली, जागतिकरणामुळे सुधारलेली अर्थव्यवस्थेमुळे, सुलभ वाहनकर्जामुळे चारचाकी गाडी हे आता स्वप्न राहिलेले नाही.एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या यश केसकर, सुधांशु मणेरीकर, सौरभ डमकले, शुभांग कुलकर्णी, प्रत्यक्ष पांडे आणि प्रेरणा कोळीपाका या विद्यार्थ्यांनी याच श्रेणीत मोडणारी चालक विरहित, स्वायत्त, विद्युत चारचारी आणि चार आसनी बोल्ट - ऑन ऑटोनॉमस व्हेइकलची निर्मिती केली आहे. यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या अद्ययावत प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. मानवी चुकांमुळे होणारे अपघात आणि मृत्यू कमी करण्यास यामुळे मदत होणार आहे. थॉटल, ब्रेक आणि स्टिअरिंगसाठी विविध प्रणालींवर विद्यार्थ्यांनी नियंत्रण केले आहे. त्यामुळे स्वयंचलित क्रियेत नियंत्रित यंत्रणा आणि विविध सेन्सर्ससह अनेक प्रकारचे अल्गोरिदम वापरून या वाहना स्टिअरिंग, थ्रॉटल आणि ब्रेकवर नियंत्रण ठेवता येते. या वाहनाची पॉवर तीन किलोवॅटची आहे. गो कार्ट प्रकारचं हे वाहन आहे. चार चाकी, चार आसनी गाडी अशी ही गाडी चार्ज करण्यास चार तासांचा वेळ लागतो. चार तासांच्या चार्जिंगमध्ये ही गाडी ४० कि.मी. चालू शकते. संस्थेचे संस्थापक आणि माईर्स सहकार्यकारी विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकार झाला. चालक विरहित स्वायत्त वाहन विद्यार्थ्यांनी प्रकल्पातून सादर करण्याची ही पहिलीच वेळ असावी, असे जोशी यांनी सांगितले. कुठे होतो अशा वाहनांचा वापर? अशा प्रकारच्या विद्युत वाहनांचा उपयोग मेट्रो स्थानकांना संलग्नित क्षेत्राशी जोडण्यासाठी, दळणवळणाकरिता उपयोगी ठरू शकतो, असा विश्वास या प्रकल्पाचे मुख्य मार्गदर्शक आणि या कॅम्पसचे प्रमुख डॉ. गणेश काकांडीकर यांनी व्यक्त केला. प्रकल्प व्यवस्थापनासाठी प्रा. श्रीकांत यादव आणि प्रा. ओंकार कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माईर्सचे संस्थापक, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. एन. टी. राव, इंजिनीअरिंगचे अधिष्ठाता डॉ. प्रसाद खांडेकर यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्राध्यापकांचे कौतुक केले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lYM6A1
via IFTTT

Post a Comment

0 Comments