Also visit www.atgnews.com
अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळाचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन
अकरावी प्रवेशासाठीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते आज करण्यात आले. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभाग सज्ज असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. बृहन्मुंबई क्षेत्र, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती आणि नाशिक शहरातील सुमारे साडेपाच लाख जागांसाठी ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. इतर ग्रामीण भागांत प्रचलित पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहेत. पहिल्या फेरीची सुरूवात आजपासून होणार असून २२ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांनी नोंदणी करायची आहे. दि. १७ ते २२ ऑगस्ट या दरम्यान सिट ची उपलब्धता बघता येईल त्याचप्रमाणे प्राधान्यक्रम भरता येणार आहे. दि. २३ ते २५ ऑगस्टदरम्यान मेरिट लिस्ट लागेल. दि. २७ ते ३० ऑगस्टदरम्यान महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. दुसऱ्या फेरीची प्रक्रिया दि. ३१ ऑगस्टला, तिसरी फेरी दि. ५ सप्टेंबरला, चौथी फेरी दि. १२ सप्टेंबरला होणार आहे. विद्यार्थ्यांना या संकेतस्थळावर जाऊन प्रवेश घेता येणार आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे - भाग एक भरणे : १४ ते २२ ऑगस्ट भाग एक व दोन भरणे : १७ ते २२ ऑगस्ट प्रवेशाची गुणवत्ता यादी : २७ ऑगस्ट प्रवेश घेणे : २७ ते ३० ऑगस्ट प्रवेशाची दुसरी फेरी : ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर प्रवेशाची तिसरी फेरी : ५ ते ११ सप्टेंबर प्रवेशाची चौथी फेरी : १२ ते १७ सप्टेंबर
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37OrZff
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments