CBSE Board Exams 2021: सीबीएसई ऑप्शनल परीक्षेच्या तारखेसंदर्भात महत्वाची माहिती

Board Exams 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डातर्फे आयोजित होणाऱ्या ऑप्शनल परीक्षेसाठी (CBSE Offline optional Exam)१५ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. जे विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या निकालावर खूष नसतील त्यांना ऑफलाइन ऑप्शनल परीक्षेचा पर्याय देण्यात आला आहे. यासाठी हे विद्यार्थी ऑनलाइन अर्ज करु शकतात. अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर यासंदर्भात महत्वाची माहिती मिळू शकते. जे विद्यार्थी कम्पार्टमेंट परीक्षेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या संधीसाठी पात्र होते आणि आता परीक्षा देऊ इच्छित आहेत ते आपल्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी पर्यायी सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२१ साठी अर्ज केला आणि त्यानंतर एक किंवा अधिक विषयात अनुपस्थित राहीले त्यांचा निकाल मागच्या परीक्षेतील गुणांच्या आधारे तयार होणार आहे. CBSE Board Exams 2021: दहावी परीक्षेचे वेळापत्रक माहिती तंत्रज्ञान - २५ ऑगस्ट २०२१ इंग्रजी भाषा आणि साहित्य - २७ ऑगस्ट २०२१ सामाजिक विज्ञान - ३१ ऑगस्ट २०२१ हिंदी अभ्यासक्रम ए आणि बी - २ सप्टेंबर २०२१ होमसायन्स - ३ सप्टेंबर २०२१ विज्ञान - ४ सप्टेंबर २०२१ कॉम्प्युटर अॅप्लीकेशन- ०७ सप्टेंबर २०२१ गणित- ०८ सप्टेंबर २०२१ सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२१: बारावी परीक्षेचे वेळापत्रक इंग्रजी कोर - २५ ऑगस्ट २०२१ बिझनेस स्टडीज - २६ ऑगस्ट २०२१ राज्यशास्त्र - २७ ऑगस्ट २०२१ शारीरिक शिक्षण - २८ ऑगस्ट २०२१ अकाऊंटन्सी - ३१ ऑगस्ट २०२१ समाजशास्त्र - ०२ सप्टेंबर २०२१ केमिस्ट्री - ०३ सप्टेंबर २०२१ सायकोलॉजी - ०४ सप्टेंबर २०२१ बायोलॉजी -०६ सप्टेंबर २०२१ यावर्षी साधारण ३५ लाख विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील ३० टक्के विद्यार्थी सीबीएसई दहावी, बारावी ऑफलाइन परीक्षा २०२१ साठी उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. ISCE बोर्डाने आधी ICSE, ISC ऑफलाइन परीक्षा २०२१ च्या तारखांची घोषणा केली होती. त्यानुसार ISCE १६ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२१ पर्यंत इम्प्रूव्हमेंट आणि कम्पार्टमेंट परीक्षा होणार आहे. ISCE परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37K61do
via IFTTT

Post a Comment

0 Comments