Also visit www.atgnews.com
NEET 2021: NTA कडून नवीन नोटीस जाहीर, नीट परीक्षेबाबत महत्वाचा निर्णय
NEET 2021: नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( National Testing Agency,NTA) ने राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेसंदर्भात ( National Eligibility cum Entrance Test, , NEET 2021) नवे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. यानुसार, एनटीएद्वारे नीट परीक्षेसाठी अर्ज शुल्क भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार आपले अर्ज शुल्क १५ ऑगस्ट रात्री ११.५० वाजेपर्यंत भरु शकतात. अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकते. एनटीएने विद्यार्थ्यांकडून वारंवार होत असलेली मागणी पाहता अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या नोंदणीकृत उमेदवारांनी आधी देण्यात आलेल्या मुदतीमध्ये परीक्षेचे अर्ज शुल्क भरले नाही अशा उमेदवारांना ही संधी देण्यात आली आहे. उमेदवार क्रेडिट/डेबिट कार्ड/नेट बँकिंग/यूपीआय आणि पेटीएम द्वारे परीक्षा/अर्ज शुल्क भरु शकतात. अद्याप ज्या उमेदवारांनी अर्ज शुल्क भरले नसेल त्यांनी शेवटच्या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. यानंतर अर्ज शुल्क भरण्याची विंडो कायमची बंद होईल. त्यानंतर उमेदवारांना ही संधी मिळणार नाही असे अधिकृत नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आले आहे. एनटीएने नीट २०२१ चे आयोजन १२ सप्टेंबरला पेन आणि पेपरच्या माध्यमातून केले आहे. नीट यूजी परीक्षेचे आयोजन एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएएस, बीयूएमएस आणि बीएचएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केला जातो. वर्ष २०२० पासून एम्स आणि जिपमरचे प्रवेश देखील नीटच्या माध्यमातून होत आहेत. या अभ्यासक्रमांसोबत बीएससी (ऑनर्स) नर्सिंग कोर्सचा देखील यावर्षी प्रवेशासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना नीट यूजीसाठी अर्ज करावा लागणार आहे. अर्जात सुधार एनटीएने जाहीर केलेल्या नोटीसनुसार, नीट यूजी २०२१ परीक्षेसाठी ठरवल्या गेलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज केल्यानंतर उमेदवारांना आपल्या अर्जात बदल करण्यासाठी तारखा देण्यात आल्या आहेत. ११ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दुपारी २ वाजेपर्यंत उमेदवार आपल्या अर्जामध्ये बदल करता येऊ शकत होता. अर्जामध्ये बदल करण्याचा पर्याय हा बंधनकारक नाही. त्यामुळे अर्जात बदल होणे गरजेचे आहे असे ज्या उमेदवारांना वाटते त्यांनीच या संधीचा उपयोग करुन घ्या. एनटीएने हा निर्णय आरोग्य विज्ञान महानिदेशालय (डीजीएचएस) आणि आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाच्या शिफारसीनुसार केला आहे. नीट यूजी २०२१ संबंधी मंत्रालयाद्वारे ही शिफारस करण्यात आली होती. या रिझल्टचा उपयोग केंद्र आणि राज्य सरकारांच्या इतर संस्थांच्या पात्रता निकषांनुसार केला जाऊ शकतो. तसेच बीएससी (ऑनर्स) नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देखील या निकालाचा उपयोग होतो. ही नवी तारीख बीएससी (ऑनर्स) नर्सिंग कोर्समध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील लागू आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yLDcta
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments