Also visit www.atgnews.com
डोंबिवलीतील स्मार्ट कल्याण विकास महामंडळात विविध पदांची भरती
Smart kalyan Dombivli : येथील स्मार्ट कल्याण डोंबिवली विकास महामंडळाअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत विविध पदांच्या एकूण ३१ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदानुसार आर्हता आणि पगाराची सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. याअंतर्गत जनरल मॅनेजर, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, डेटा अॅनालिस्ट, नेटवर्क इंजिनीअर, जीआयएस इंजिनीअर, सॉफ्टवेअर इंजिनीअर, सर्वेयर, सुपरवायझर आणि क्लर्क कम टायपिस्ट पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. याअंतर्गत एकूण २४ जागा भरल्या जातील. आरक्षित वर्गाला सरकारी नियमानुसार सवलत मिळणार आहे. या रिक्त पदांच्या शैक्षणिक पात्रतेसंदर्भातील माहिती मूळ जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे. बातमीखाली याची लिंक देण्यात आली आहे. जाहिरातीच्या नोटिफिकेशनमध्ये अर्ज करण्याचा नमुना देण्यात आला आहे. या नमुन्यानुसार अर्ज भरुन पाठवायचा आहे. दिनांक २५ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सीईओ, स्मार्ट कल्याण डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि., सर्वोदय मॉल, एपीएमसी मार्केट जवळ, कल्याण (पश्चिम), ठाणे, पिनकोड- ४२१३०१ या पत्त्यावर आपल्या अर्जाची प्रत पाठवायची आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AGPxz9
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments