हॉटेल मॅनेजमेंटमधील करिअरच्या संधी

डॉ. ज्योती पेशवे करोनामुळे गेल्या दीड वर्षांत हॉस्पिटॅलिटी व टुरिझम क्षेत्राला सर्वांत हलाखीचे दिवस आले. लोकांचे बाहेर जाणे, हॉटेलिंग, फिरणे अशा सर्वच गोष्टींवर निर्बंध आले. यार्व परिस्थितीत सुद्धा बऱ्याच लोकांना तारले ते म्हणजे घरगुती खानावळी, होम शेफ्स या सर्व पाक कलेतील पारंगत क्षेत्रातील लोकांनी. म्हणतात ना जोपर्यंत जग आहे, तोपर्यंत मनुष्याला अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा लागणारच. निर्बंध शिथिल होत आहेत आणि त्याच दरम्यान 'रिव्हेंज टुरिझम' ही संकल्पना खूपच फोफावत चालली आहे. आज माणूस मिळेल तेंव्हा आणि तिथ, मोकळा श्वास घ्याला घराघरातून सहलीला बाहेर पडत आहे. मग ते फार्म हाउस असो, पावसाळ्यातील ट्रेक असो किंवा एखादे निसर्गरम्य ठिकाण असो. या सर्व क्षेत्रासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ व प्रशिक्षण मिळते ते म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटच्या डिग्री कोर्सेस चालवणाऱ्या संस्थामधून! हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात लागणारे कुशल मनुष्यबळ अशा संस्थामधून तयार होतात. या क्षेत्रात लागणारे विविध कौशल्य, नेतृत्व व्यवस्थापन व आदरातिथ्य कलेचे प्रशिक्षण या संस्थांमधून दिले जाते. या क्षेत्रात प्रात्यक्षिक ज्ञानावर अधिक भर दिला जातो. त्याचबरोबर उत्तम संभाषण कौशल्य, तांत्रिक प्रशिक्षण व व्यक्तिमत्त्व विकास अशा विविध अंगाने विद्यार्थ्यांची जडण घडण होते. अशा संस्थांमधून विद्यार्थ्यांना हॉटेल व सेवा क्षेत्राशी निगडीत विविध रोजगार संधी उपलब्ध होतात. विद्यार्थ्यांना शिकत असताना 'इंटर्नशिप' अंतर्गत भारतात व परदेशातील पंचतारांकित हॉटेलमध्ये शिकण्याची संधी मिळते. या अभ्यासक्रमास केंद्र सरकारतर्फे एनसीएचएमसीटी अंतर्गत ४० विविध संस्थांमधून सर्टिफिकेट, डिप्लोमा व डिग्री असे विविध कोर्सेस शिकवले जातात. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पुणे, मुंबई, नागपूर शहरांमध्ये विविध मॅनेजमेंट संस्थांमधून चार व तीन वर्षाचे डिग्री कोर्सेस उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांमध्ये हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील प्रमुख चार विभाग फूड प्रॉडक्शन, फूड अँड बेव्हरेज, हाउसकिपिंग व फ्रंट ऑफिस या विभागाचे कार्य व प्रात्यक्षिक शिकवले जाते. त्याचप्रमाणे फ्रेंच क‌‍‍म्युनिकेशन स्किल्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व विविध व्यवस्थापन विषय असे अभ्यासक्रमात शिकवले जातात. अभ्यासक्रमातील संकल्पना, नियोजन, आत्मविश्वास, प्रत्यक्ष कार्यक्षेत्राचा अनुभव, क्षमता, जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या काळात मिळते. भारतात/ परदेशात विविध नामांकित हॉटेल, स्टँड अलोन रेस्टॉरंट, मॉल्स अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे इंटर्नशिप करण्याची चार ते सहा महिन्यांसाठी संधी देण्यात येते. अशा संस्थामध्ये कँम्पस प्लेसमेंटसाठी नामांकित कंपन्या निमंत्रित केल्या जातात. क्षमता चाचणी, संभाषण कौशल्य, व्यक्तिमत्व चाचणी, गटचर्चा अशा विविध निकषांतून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना सेवा क्षेत्राशी निगडीत विविध नोकऱ्या व्यवसायासाठी संधी उपलब्ध होतात. पंचतारांकित हॉटेल्स, एअर लाइन्स, पर्यटन, फूड ब्लॉगर, नोकऱ्या, होम शेफ, फूड फोटोग्राफी, कस्टमर केअर, मॉल्स, मल्टीप्लेक्स, फास्टफूड कंपनी, इंडस्ट्रीअल केटरिंग, शिक्षण क्षेत्र, बँकिंग एचआर, भारतीय संरक्षण दल, आयटी, बीपीओ या क्षेत्रांमध्ये करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास व आत्मनिर्भरता विकसित होते. पुणे येथे भारती विद्यापीठ विश्वविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सिम्बायोसिस विद्यापीठ अशा विविध संस्थांमध्ये हे अभ्यासक्रम शिकण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामध्ये बारावीनंतर तीन व चार वर्ष डिग्रीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहे. (लेखिका भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजीत असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.)


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CMXip3
via IFTTT

Post a Comment

0 Comments