Also visit www.atgnews.com
पॉवर ग्रीडतर्फे विविध पदांच्या १३७ जागा रिक्त
Power grid : भारत सरकारच्या विद्युत विभागाअंतर्गत येणाऱ्या पॉवर ग्रीडमध्ये विविध पदांच्या एकूण १३७ जागा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. देशभरातील विविध जागांसाठी ही भरती सुरु आहे. याअंतर्गत फिल्ड इंजिनीअर (इलेक्ट्रीकल), फील्ड इंजिनीअर (सिविल), फील्ड सुपरवायजर (इलेक्ट्रीकल), फील्ड सुपरवायजर ही पदं भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करणे गरजेचे आहे. उमेदवारांना २७ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहे. फील्ड इंजिनीअर (इलेक्ट्रीकल) च्या एकूण ४८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. फील्ड इंजिनीअर (सिविल) पदाच्या एकूण १७ जागा, फील्ड सुपवायजर (इलेक्ट्रीकल)च्या एकूण ५० रिक्त जागाआणि फिल्ड सुपरवायजर (सिविल)च्या एकूण २२ जागा भरण्यात येणार आहेत. कालावधी ही भरती २४ महिन्यांच्या कालावधीसाठी आणि प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे. यासाठी पॉवर ग्रीडतर्फे तरुण, अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. वयोमर्यादा उमेदवाराचे वय २७ ऑगस्ट २०२१ पर्यंत २९ वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. उमेदवाराचा जन्म हा २७ ऑगस्ट १९९२ च्या आधी आणि २७ ऑगस्ट २००३ च्या नंतरचा नसावा. शैक्षणिक आर्हता या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडे पूर्ण वेळ बीई, बीटेक, बीएससी(इंजि), बीई (पॉवर इंजि) हे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शिक्षणसंस्थेतून असणे गरजेचे आहे. खुल्या वर्गासाठी किमान ५५ टक्के तर आरक्षित वर्गासाठी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. अनुभव उमेदवाराकडे डिझाइन, इंजिनीअरिंग, कंन्स्ट्रक्शन इन रुरल इलेक्ट्रीफिकेशन डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट सिस्टिम (DMS) / सब ट्रान्समिशन (ST)/ट्रान्समिशन लाईन्स(TLs)/सब स्टेशन (S/S) चा एक वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. विविध पदांसाठी शैक्षणिक आर्हता आणि अनुभवाबद्दल नोटिफिकेशनमध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांना स्वत:ची नोंदणी नॅशनल स्किल रजिस्ट्रीमध्ये करणे आवश्यक आहे. अर्ज शुल्क फिल्ड इंजिनीअर (इलेक्ट्रीकल/सिविल) साठी ४०० रुपये आणि फिल्ड सुपरवायजर (इलेक्ट्रीकल/सिविल) साठी ३०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3sdXzNc
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments