आयआयटी मुंबईत नोकरीची संधी, असा करा अर्ज

IIT Mumbai : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबईत तांत्रिक अधीक्षक, रजिस्टार, डेप्युटी रजिस्टार पदांची भरती आहे. यासोबतच टीजीटी हिंदी, टीजीटी विज्ञान, प्राथमिक (चित्रकला) आणि प्राथमिक शिक्षक (संगीत) या पदांसाठी तात्पुरत्या कालावधीसाठी पदं भरली जाणार आहेत. आयआयटी मुंबईतर्फे इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी आयआयटी मुंबईच्या अधिकृत वेबसाइटवर iitb.ac.in ऑनलाइन माध्यमातून अर्ज भरायचा आहे. २७ ऑगस्ट ही ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीची अधिक माहिती अधिकृत वेबसाइट वेबसाइटवर देण्यात आली आहे. तांत्रिक अधीक्षकांची निवड ही कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाणार आहे. कौशल्य चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेची संधी देण्यात येणार आहे. लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आणि गुणवत्ता यादीतील रॅंकच्या आधारे उमेदवाराची तांत्रिक अधीक्षक पदासाठी निवड होणार आहे. स्क्रीनिंग टेस्टच्या आधारे शिक्षकांची निवड केली जाणार आहे. यामध्ये उत्तीर्ण झालेल्यांना लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल. पदासाठी अंतिम निवड लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आणि गुणवत्ता यादीतील परिणामी रँकवर आधारित असेल. रजिस्टारचे पद प्रतिनियुक्तीद्वारे भरले जाणार आहे. डेप्युटी रजिस्टारची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. प्राथमिक शॉर्टलिस्टिंगसाठी लेखी परीक्षा / ग्रुप डिस्कशन होईल. बद्दल जाणून घ्या आयआयटी मुंबईची स्थापना १९५८ साली झाली असून ती देशातील प्रमुख संस्थांपैकी एक आहे. संस्थेमध्ये पदवी, पदव्युत्तर कार्यक्रमांसाठी विविध अभ्यासक्रम घेण्यात येतात. ही अभियांत्रिकी आणि संशोधनासाठी नावाजलेली संस्था आहे. आयआयटी मुंबईतील विविध पदांबद्दल अधिक तपशीलासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देणे गरजेचे आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iDAEHG
via IFTTT

Post a Comment

0 Comments