दिल्लीच्या शाळांमध्ये देशभक्तीचा अभ्यासक्रम शिकवला जाणार, जाणून घ्या सविस्तर

will be taught in : दिल्ली सरकारच्या निर्णयानंतर आता राज्यातील शाळांमध्ये देशभक्तीचा अभ्यासक्रम सुरु करण्याची तयारी सुरु झाली आहे. यानुसार स्टेट काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग (एससीईआरटी) च्या गव्हर्निंग काऊन्सिलने शुक्रवारी अभ्यासक्रमाला मंजुरी दिली. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव सादर करण्यात आला. मोतीबाग सर्वोदय कन्या विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेणू भाटीया आणि माजी प्राचार्या शारदा कुमारी या दोघी या समितीच्या अध्यक्षा आहेत. या समितीमध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक, नागरिक, सामाजिक संघटना या सर्वांशी चर्चा करुन शिफारस सादर करण्यात आल्या आहेत. यावर्षी मार्चमध्ये दिल्ली विधानसभेच्या वार्षिक अर्थसंकल्पामध्ये देशभक्ती अभ्याक्रमाची घोषणा करण्यात आली होती. दिल्ली सरकारने शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रीयता निर्माण करण्याच्या हेतूने ही घोषणा केली. या दरम्यान दिल्ली सरकारने ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. यासोबतच सरकारने १२ मार्चपासून ७५ आठवड्यांपर्यंत म्हणजे १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले होते. याव्यतिरिक्त सरकारने शिक्षण क्षेत्रात महत्वाच्या निर्णयांची घोषणा केली. याअंतर्गत दिल्लीमध्ये पहिली सैनिकी शाळा उघडण्याची माहिती देण्यात आली होती. दिल्ली सरकारच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक मुलामध्ये देशभक्ती आणि राष्ट्रीय भावना निर्माण करण्यासाठी आणि त्यांना जबाबदार नागरिक बनविण्यासाठी देशभक्ती अभ्यासक्रम सुरु करत असल्याचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सांगितले. २० कोटींचा बजेट दिल्ली सरकारतर्फे देशभक्ती अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांसाठी शहीद भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी आणि संघर्षमय जीवनावरील कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. सरकारने यासाठी २० कोटींचे बजेट ठेवले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VEDMKj
via IFTTT

Post a Comment

0 Comments