SSC Jobs: एसएससी एमटीएस, सीजीएल, जेई आणि स्टेनो भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

SSC Recruitment Exam Date and Admit Card 2021: कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) ने आपल्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर एसएससीच्या अनेक भरती परीक्षा २०२१ (SSC Recruitment Exam 2021) ची घोषणा केली आहे. यामध्ये कम्बाइंड ग्रॅज्युएट लेवल एक्झाम २०१९ (SSC ), ज्युनिअर इंजिनीअर एक्झाम २०२० (SSC ), मल्टी टास्किंग कर्मचारी परीक्षा २०२० 0 ( Exam) आणि स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी एक्झाम २०१९ (SSC Steno exam) यांचा समावेश आहे. यूपीएससीतर्फे जाहीर करण्यात आलेल्या नोटीसनुसार एसएससी सीजीएल एक्झाम २०१९ (SSC Combined Graduate Level Examination-2019) ची चाचणी परीक्षा १५ आणि १६ सप्टेंबरला होणार आहे. तर स्टेनोग्राफर ग्रुप सी आणि डी (SSC Stenographer Grade ‘C’ and ‘D’ Examination, 2019)ची परीक्षा २१ आणि २२ ऑक्टोबर २०२१ ला होणार आहे. SSC MTS 2021 Exam and Admit card एसएस एमटीएस एक्झाम २०२० ही ५ ते २० ऑक्टोबर २०२१ होणार आहे. या भरतीचे नोटिफिकेशन फेब्रुवारी २०२१ मध्ये जाहीर करण्यात आले. यासाठी ऑनलाइन अर्ज ५ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२१ पर्यंत मागविण्यात आले होते. एसएससी एमटीएस प्रवेश पत्र सप्टेंबर २०२१ च्या महिन्यात येण्याची शक्यता आहे. SSC JE Exam 2020 Paper 2 एसएससी सिविल, मॅकेनिकल, इलेक्ट्रीकल आणि क्वांटीटी सर्वे अॅण्ड कॉन्ट्रॅक्टमध्ये ज्युनिअर इंजिनीअर (JE) ग्रुप बी भरती परीक्षा २०२० पेपर II चे आयोजन २६ सप्टेंबरला केले जाणार आहे. पेपर १ विविध केंद्रांमध्ये २२ ते २४ मार्च २०२१ ला झाला होता. याचा निकाल जून २०२१ मध्ये आला होता. एसएससी जेई पेपर २ चे प्रवेश पत्र लवकरच एसएससीच्या विभागीय वेबसाइटरवर येण्याची शक्यता आहे. SSC CGL Tier-1 admit card आयोगाने (एसएससी) मध्य प्रदेश, सेंट्रल आणि नॉर्थ रिजनसाठी सीजीएल एक्झाम २०२१ साठी प्रवेश पत्र जाहीर केले आहे. एसएससी सीजीएल टियर १ परीक्षा १३ ते २४ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. उमेदवारांना एसएससी भरती परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाची माहिती कर्मचारी निवड आयोग (SSC) च्या अधिकृत वेबसाइटवर मिळेल. करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी निर्देशांनुसार आयोगातर्फे माहिती अपडेट केली जाण्याची शक्यता आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lAsiTg
via IFTTT

Post a Comment

0 Comments