डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठात भरती, शैक्षणिक पात्रता आणि पगार जाणून घ्या

Recruitment: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय विभागामध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीपर्यंत हे अर्ज ऑनलाइन माध्यमातून पाठवणे गरजेचे आहे. हे रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथे असून ते राज्य सरकारच्या अख्त्यारित येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार एकूण १३ जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये कायदा तज्ञ (वकील) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता आणि पगार हा पदानुसार वेगळा असणार आहे. कायदेशीर सल्लागार पदासाठी निकष विद्यापीठाला रोजच्या कार्यालयीन कामामध्ये कायदेशीर सल्लागाराची गरज आहे. याअंतर्गत वकील पदाच्या एकूण १२ जागा रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तालुका कोर्ट मानगावमध्ये ४ जागा, अलिबाग जिल्हा कोर्टात ४ जागा आणि मुंबई हायकोर्टात ४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक वकीलांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवाराचे चांगल्या अनुभवासह LLM/LLB चे शिक्षण पूर्ण असाावे. त्याला बार काऊन्सिलची परवानगी असावी. निवड झालेल्या उमेदवाराकडे शैक्षणिक आणि प्रशासकीय कामांमध्ये विद्यापीठाला कायदेशीर सल्ला देण्याचे काम असणार आहे. संस्थेकडून देण्यात येणारी उत्तरे, एमओयू, आरटीआय असे अहवाल ड्राफ्ट करणे किंवा अशाप्रकारचे इतर कायदेशीर काम करावे लागेल. वकील पदाकरिता इच्छुक उमेदवारांनी pa2registrar@dbatu.ac.in या ईमेलवर आपला अर्ज पाठवायचा आहे. १५ ऑगस्टपर्यंत आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी निकष मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाची एक रिक जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवाराला १ लाख ५० हजार पर्यंत पगार देण्यात येईल. या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनीअरिंगमध्ये पीएचडी किंवा सायन्स/एमबीए/एमटेकमध्ये पदवी असणे गरजेचे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज registrar@dbatu.ac.in या ई-मेलवर पाठवायचा आहे. १० ऑगस्टपर्यंत ईमेलवर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार आहे. तसेच अर्जाची हार्ड कॉपी आणि संबंधित कागदपत्रे १२ ऑगस्टपर्यंत विद्यापीठाच्या पत्त्यावर पोहोचणे गरजेचे आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jwblXk
via IFTTT

Post a Comment

0 Comments