Also visit www.atgnews.com
देशातील मुलींसाठी सैनिकी शाळा सुरु होणार, पंतप्रधानांची घोषणा
Sainik School for Girls: ७५ व्या स्वातंत्र्यदिनी यांनी देशातील मुलींसाठी सैनिकी शाळा सुरु करण्याची घोषणा केली. 'आत्मनिर्भर भारत'वर भर देत शिक्षण क्षेत्रासाठी अनेक सुधारणांच्या घोषणा त्यांनी यावेळी केल्या. त्याअंतर्गत मुलींसाठी सैनिक शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्याचा पहिला प्रयोग अडीच वर्षांपूर्वी मिझोरममध्ये करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर देशातील सर्व सैनिक शाळा देखील मुलींसाठी उघडल्या जातील असा सरकारने निर्णय घेतल्याचे पंतप्रधान म्हणाले. आम्हालाही सैनिक शाळांमध्ये शिक्षण घ्यायचे आहे असे संदेश मला लाखो मुलींकडून येत असतात. त्यांच्यासाठी सैनिक शाळांचे दरवाजे उघडले पाहिजेत. सध्या भारतात ३३ सैनिक शाळा सुरु आहेत. या सर्व शाळांमध्ये मुलींनाही प्रवेश मिळेल असे पंतप्रधान म्हणाले. आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोर्डाच्या परीक्षेतील मुलींच्या सर्वोत्तम कामगिरीचे कौतुक केले. तसेच ऑलिम्पिकमधील मुलींच्या कामगिरीबद्दल बोलताना सर्वांची साथ, सर्वांचा विकास आणि सर्वांचा विश्वास असे आवाहन केले. आपल्याला स्वातंत्र्यांच्या शंभरीकडे जाताना आत्मनिर्भर भारताचे उद्दीष्ट पूर्ण करायला हवे असे ते म्हणाले. गरिबीशी लढण्यासाठी NEP 2020 पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात नवे शैक्षणिक धोरणाबद्दल (National Education Policy)माहिती दिली. या धोरणामुळे प्रादेशिक भाषेचे संवर्धन होण्यासोबतच गरिबीशी लढण्याचे एक साधन निर्माण होईल. अलीकडेच, सरकारने NEP 2020 च्या अंमलबजावणीचे पहिले वर्ष देखील साजरे केल्याचेही ते म्हणाले. खेळांना मुख्य प्रवाहात आणणार पंतप्रधान म्हणाले, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये खेळाला मुख्य प्रवाहातील शिक्षणाचा एक भाग बनवण्यात आले आहे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी खेळ हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. तरुणांसाठी रोजगाराच्या संधी खुल्या होणार पंतप्रधान गतीशक्ती योजना सुरू केली जाणार आहे. पंतप्रधान गतीशक्ती- राष्ट्रीय मास्टर प्लॅन औद्योगिक उपक्रमांना चालना देण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी असेल असेही ते म्हणाले. यातील शंभर लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या योजनांमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचे ते म्हणाले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CQmICd
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments