CBSE:दहावीच्या निकालावर नाखूष? काळजी करु नका; बोर्डाने दिलाय 'हा' पर्याय

Result 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) ने दहावी परीक्षांचा निकाल जाहीर केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती ते आपला निकाल अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in वर पाहू शकतात. यावर्षी करोनामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. आता दहावी आणि बारावी दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. परीक्षा झाल्या नसल्याने विद्यार्थ्यांना रिचेंकिंगचा पर्याय उपलब्ध नाही. विद्यार्थी आपल्या उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन करु शकत नाहीत. यासाठी त्यांना इतर पर्याय निवडावे लागतील.जर विद्यार्थी अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने दिलेल्या गुणांशी नाखूष आहेत तर ते ऑफलाइन परीक्षेला बसण्याचा पर्याय निवडू शकतात. ही परीक्षा १६ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. आपल्या गुणांमध्ये सुधार होण्यासाठी प्रत्यक्षात परीक्षेत सहभागी होऊ इच्छितात अशा उमेदवारांसाठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बोर्डाच्या रिझल्टमध्ये कम्पार्टमेंट कॅटेगरीमध्ये ठेवलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील परीक्षेचे आयोजन होणार आहे. ही परीक्षा १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. सुमारे १८ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी देशभरातून नोंदणी केली होती. एकूण ९९.०४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची लिंक बोर्डाने अॅक्टिव्ह केली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येणार आहे. आपल्या रोल नंबरच्या सहाय्याने निकाल पाहता येणार आहे. रोल नंबर माहित नसल्यास तो कसा मिळवावा, हे या वृत्तात पुढे देण्यात आले आहे. पुढील संकेतस्थळांवर सीबीएसई दहावीचा निकाल पाहता येणार आहे - ९० टक्क्यांहून अधिक गुण किती विद्यार्थ्यांना? सीबीएसई दहावीत देशभरात एकूण २,५८,७८६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. यापैकी २,००,९६२ विद्यार्थ्यांना ९० ते ९५ टक्क्यांदरम्यान गुण आहेत. उर्वरित ५७,८२४ विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. on DigiLocker: रिझल्ट असा तपासा स्टेप १- सर्वात आधी डिजिलॉकरची अधिकृत वेबसाइट digilocker.gov.in वर जा स्टेप २- होमपेजवर एज्युकेशन सेक्शनमध्ये सीबीएसईवर क्लिक करा स्टेप ३ - दहावी क्लास मार्कशीट किंवा दहावी पासिंग सर्टिफिकेटवर क्लिक करा स्टेप ४ - आता रजिस्टर मोबाइलच्या मदतीने सीबीएसई दहावी रिझल्ट २०२१ तपासा स्टेप ५ - रिझल्ट डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंटआऊट काढा


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ylxwpt
via IFTTT

Post a Comment

0 Comments