Also visit www.atgnews.com
HSC Result 2021: बारावी निकालानंतर गुणपडताळणी, छायाप्रती, पुनर्मूल्यांकन नाही
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर यंदा बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. निकाल दहावी, अकरावीचे वार्षिक परीक्षेतील गुण आणि बारावीतील अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आला. परिणामी यंदा बारावी निकालानंतर गुणपडताळणी, छायाप्रती, पुनर्मूल्यांकन अशी कोणतीही प्रक्रिया होणार नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. परीक्षांच्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना दाखवल्या जात असल्याने गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत किंवा पुनर्मूल्यांकन या सुविधा यंदा उपलब्ध नसतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाबाबत काही तक्रार असेल, तर त्याचे निवारण करण्यासाठी मंडळाने विभागीय स्तरावर हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. श्रेणीसुधार योजनेत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल नाही बारावीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी यंदा श्रेणीसुधार योजनेसाठी नोंदणी केली होती, त्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. कारण श्रेणीसुधारसाठी परीक्षाच झालेली नाही. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधींमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. या विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेच्या एक किंवा दोन संधी उपलब्ध राहतील, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे. बारावीचा निकाल कुठे पाहता येईल? पुढील संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना वैयक्तिक निकाल पाहता येणार आहे - याशिवाय व या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकालाशिवाय निकालाबाबततची अन्य सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Vmy6F3
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments