CBSE दहावीच्या १६ हजार ६३९ विद्यार्थ्यांना अद्याप रिझल्टची प्रतिक्षा, जाणून घ्या कधी मिळणार मार्कशिट?

10th Result 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड () ने आज दहावीचा निकाल जाहीर केला. यावर्षी सीबीएसईचा निकाल ९९.४६ टक्के इतका लागला. यावर्षीचा निकाल साधारण ८ टक्के जास्त आहे. परीक्षेला नोंदणी केलेले विद्यार्थी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in किंवा cbseresults.nic.in वर निकाल पाहू शकतात. नोंदणी केलेले एकूण विद्यार्थ्यांची संख्या २१ लाख ५० हजार ६०८ इतकी आहे. तर खासगीरित्या तसेच कॉरेस्पॉंडंट नोंदणी केलेले विद्यार्थी ३६ हजार ८४१ आहेत. नियमित विद्यार्थ्यांची संख्या २१ लाख १३ हजार ७६७ इतकी आहे. निकाल जाहीर झालेले विद्यार्थी २० लाख ९७ हजार १२८ इतके आहेत. तर अद्याप निकाल जाहीर न झालेले विद्यार्थ्यांची संख्या १६ हजार ६३९ इतकी आहे. आणि कंपार्टमेंटसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १७ हजार ६३६ इतकी आहे. अशा पद्धतीने सीबीएसई दहावीचा एकूण निकाल - ९९.०४ टक्के इतका लागला आहे. यावर्षी २.७६ टक्के विद्यार्थ्यांना ९५टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. तर ५७ हजार ८२४ विद्यार्थ्यांना ९५ टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळाले. साधारण १ हजार ६० नव्या शाळांचा निकाल अद्याप प्रक्रियेमध्ये आहे. यावर कोणते रेफरन्स वर्ष नव्हते. म्हणून हा निकाल राखून ठेवण्यात आला होता. दरम्यान, बोर्डाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता ५ ऑगस्टला निकाल जाहीर करण्याची घोषणा केली आहे. ३० जुलैला १२ वीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. ज्यामध्ये ६५ हजार विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप तयार नाहीत. यांची घोषणा देखील ५ ऑगस्टला केली जाणार आहे. यावर्षी करोनामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. आता सीबीएसई दहावी आणि बारावी दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. परीक्षा झाल्या नसल्याने विद्यार्थ्यांना रिचेंकिंगचा पर्याय उपलब्ध नाही. विद्यार्थी आपल्या उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन करु शकत नाहीत. यासाठी त्यांना इतर पर्याय निवडावे लागतील.जर विद्यार्थी अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने दिलेल्या गुणांशी नाखूष आहेत तर ते ऑफलाइन परीक्षेला बसण्याचा पर्याय निवडू शकतात. ही परीक्षा १६ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. आपल्या गुणांमध्ये सुधार होण्यासाठी प्रत्यक्षात परीक्षेत सहभागी होऊ इच्छितात अशा उमेदवारांसाठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बोर्डाच्या रिझल्टमध्ये कम्पार्टमेंट कॅटेगरीमध्ये ठेवलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील परीक्षेचे आयोजन होणार आहे. ही परीक्षा १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. पुढील संकेतस्थळांवर सीबीएसई दहावीचा निकाल पाहता येणार आहे -


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xkb8LN
via IFTTT

Post a Comment

0 Comments