Email Of Threat: बीकॉमच्या विद्यार्थ्यानेच मुंबई विद्यापीठाला दिली बॉम्बस्फोटाची धमकी

मुंबई: मुंबई विद्यापीठाचा बॉकॉम अभ्यासक्रमाचा निकाल लवकर लागला नाही, तर विद्यापीठाचे कॅम्पस बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी एका विद्यार्थ्यानेच दिल्याचे निष्पन्न झाले आहे. याच विद्यार्थ्याने धमकीच ईमेल पाठवला होता. निकाल प्रलंबित असल्याने हा विद्यार्थी मानसिक तणावात होता. या तणावातच त्याने शिवीगाळ करणारा ईमेल पाठवला होता. या विद्यार्थ्याला ताकीद आणि नोटीस देत सोडून देण्यात आले आहे. या कॉमर्सच्या विद्यार्थ्याने एका सायबर कॅफेमधून विद्यापीठाला धमकीचा ईमेल पाठवला होता. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकाच्या मेलवर हा ईमेल १२ ऑगस्टला प्राप्त झाला होता. यासंबंधी विद्यापीठ प्रशासनाने शुक्रवारी १३ ऑगस्ट रोजी बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या मेलचा तपास केल्यानंतर तो खोट्या तपशीलाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या ईमेल आयडीवरून पाठवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांना आरोपीला ताब्यात घेतले. मात्र हा आरोपी एक विद्यार्थी असून मानसिक तणावातून त्याने हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iO8Ctf
via IFTTT

Post a Comment

0 Comments