Indian Air Force Recruitment 2021: दहावी, बारावी पास असणाऱ्यांसाठी वायुसेनेत नोकरी

Indian Air Force : भारतीय वायुसेनेमध्ये ग्रुप-सीच्या सिव्हिलियन पदांच्या भरतीसाठी नोटीफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या नोटिफिकेशन नुसार, सिव्हिलियन श्रेणीचे अधीक्षक, लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टोअर कीपर, कुक, पेंटर च्या २८२ रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट indianairforce.nic.in वर जाऊन अर्ज करु शकता. भारतीय वायु सेनेतर्फे (Indian Air Force)जाहीर करण्यात आलेल्या भरतीसाठी () ७ सप्टेंबरपर्यंत अर्ज करु शकता. सर्व पदांसाठी १८ ते २५ वर्षे इतकी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. अर्जामध्ये काही चूक आढळल्यास फॉर्म रद्द केला जाईल. त्यामुळे फॉर्म भरताना काळजी घ्या. नोकरीचा तपशिल ग्रुप सी सिव्हिलियन - २८२ पद मुख्यालय देखरेख- १५३ पद मुख्यालय पूर्व वायु कमान- ३२ पद मुख्यालय दक्षिण पश्चिमी वायु कमान -११ पद स्वतंत्र युनिट्ससाठी- १ पद कुक (सामान्य ग्रेड) साठी- ५ पद मेस स्टाफसााठी- ९ पद मल्टी टॉकिंग स्टाफ- १८ पद हाऊसकिपिंग स्टाफ- १५ पद हिंदी टायपिस्ट- ३ पद लोअर डिव्हिजन क्लर्क- १० पद स्टोअर कीपर- ३ पद कारपेंटर- ३ पद पेंटर- १ पद अधीक्षक (स्टोअर) साठी- ५ पद सिव्हिलियन मॅकेनिक ट्रान्सपोर्ट ड्रायव्हरसाठी- ३ पद असा करा अर्ज इच्छुक उम्मीदवार रिक्त जागा आणि योग्यतेनुसार आपल्या पसंतीच्या वायु स्टेशनवर ऑफलाइन माध्यमातून अर्ज करु शकतात. हा अर्ज नोटिफिकेशनमध्ये दिल्या गेल्या फॉर्मेटनुसार सामान्य पोस्ट/ नोंदणीकृत पोस्ट/ कुरिअरच्या माध्यमातून संबंधित वायुसेना स्टेशनवर जमा करावा लागेल. पात्रता आणि निकष या वॅकेन्सीमध्ये विविध पदांसाठी वेगवेगळे पात्रता, निकष ठेवण्यात आले आहेत. अधिक्षक पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी लोअर डिव्हीजन क्लर्क पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी स्टोअर किपर पदासाठी बारावी किंवा समकक्ष कुक (साधारण ग्रेड) च्या पदाससाठी- कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रीकसहित कॅटरिंगमध्ये सर्टिफिकेट डिप्लोमा पेंटर, कारपेंटर, कूपर स्मिथ आणि शीट मेटल वर्कर, ए/सी मेक, फिटर, हाऊस किपिंग स्टाफ, लॉंड्रीमन, मेस स्टाफ, एमटीएस, टेलर, ट्रेसमन- कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातूनन दहावी पास हिंदी टायपिस्ट पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी पास


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yAFr2b
via IFTTT

Post a Comment

0 Comments