Also visit www.atgnews.com
JEE Main 2021: चौथ्या सत्राच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची आणखी एक संधी
Registration: ज्या उमेदवारांनी सेशन ४ रजिस्ट्रेशन केलेले नाही, त्या उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती आहे. परीक्षा आयोजित करणारी संस्था राष्ट्रीय परीक्षा एजेंसी (NTA) ने जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (मेन) २०२१ च्या चौथ्या टप्प्यातील परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली आहे. अॅप्लिकेशन विंडो एनटीएने पुन्हा ओपन केली आहे. ही विंडो ११ ऑगस्ट २०२१ रात्री ९ वाजेपर्यंत खुली राहणार आहे. परीक्षा शुल्क उमेदवारांना ११ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंत भरता येणार आहे. मेन फेज ४ अॅप्लिकेशन २०२१ साठी परीक्षा शुल्काचा भरणा ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. २६, २७ आणि ३१ ऑगस्ट आणि १, २ सप्टेंबर २०२१ या कालावधीत परीक्षा होणार आहे. अर्जात दुरुस्तीची संधी एनटीएने जेईई मेन चौथ्या टप्प्यासाठी नोंदणी २०२१ साठी अर्ज विंडो तसेच अर्जात आवश्यक सुधारणांसाठी आधीच अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी सुधारणा विंडो पुन्हा उघडली आहे. अशा परिस्थितीत, ज्या उमेदवारांना त्यांच्या अर्जात कोणतीही त्रुटी सुधारणे किंवा दुरुस्ती करायची आहे, ते आता ११ ऑगस्ट २०२१ पर्यंत सुधारणा करू शकतील. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की NTA ने या तारखेनंतर अर्जामध्ये सुधारणा करण्याची कोणतीही संधी जाहीर केलेली नाही. नोटीस जारी NTA ने जेईई मेनच्या चौथ्या टप्प्यासाठी नोंदणी आणि अर्ज दुरुस्ती विंडो पुन्हा उघडण्याबाबतची सूचना सोमवारी ९ ऑगस्ट २०२१ रोजी jeemain.nta.nic.in या परीक्षा पोर्टलवर जारी केली आहे. एजन्सीच्या सूचनेनुसार, ज्या उमेदवारांनी ११ ऑगस्टपर्यंत यशस्वीरित्या अर्ज सादर केला आहे किंवा आवश्यक सुधारणा केल्या आहेत, त्यांच्यासाठी जेईई मेन फेज ४ प्रवेशपत्र २०२१ संबंधित माहिती लवकरच परीक्षा पोर्टलवर जारी केली जाईल. NTA ने २६, २७ आणि ३१ ऑगस्ट आणि १, २ सप्टेंबर २०२१ रोजी चौथ्या टप्प्याची JEE Main परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3s00VDi
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments