MPSC Exam 2021:महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर

Update: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा शनिवार ४ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. ही परीक्षा ११ एप्रिल २०२१ रोजी होणार होती, मात्र कोविड विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली होती. लोकसेवा आयोगाने या परीक्षेसंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. यात असे म्हले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, ११ एप्रिल २०२१ रोजी नियोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट - ब संयुक्त पूर्व परीक्षा - २०२० पुढे ढकलण्यात आली होती. सामान्य प्रशासन विभागाच्या ९ एप्रिल २०२१ च्या पत्रान्वये सूचना प्राप्त झाल्यानंतर ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती. मात्र आता आपत्ती व्यवस्थापन विभाग, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग यांच्याकडून ३ ऑगस्ट २०२१ रोजी आलेल्या पत्रातील अभिप्रायानुसार ही परीक्षा शनिवार ४ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात येईल. आयोगाने असेही म्हटले आहे की कोविड विषाणू प्रादुर्भावाच्या स्थितीच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोग वेळोवेळी आढावा घेईल. तसेच याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्तळावर प्रसिद्ध करण्यात येईल. यामुळे आयोगाचे संकेतस्थळ नियमितपणे पाहण्याचे आवाहनदेखील उमेदवारांना करण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lsrEaa
via IFTTT

Post a Comment

0 Comments