MPSC Recruitment 2021: महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागात भरती, 'येथे' करा अर्ज

MPSC : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. या विभागात १६ रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २६ ऑगस्टपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे. पदांचा तपशिल वृक्क विकारशास्त्र (Nephrology) विभागात २ पदं, ह्रदयशास्त्र (Cardiology) विभागात ३ पदं, अंत:स्त्रावशास्त्र (Endocrinology)चे १ पद, मज्जातंतूशास्त्र ( Neurlogy) विभागात ३ पदं, मुत्रविकारशास्त्र (Urology)मध्ये ३ पदं, सुघटनशल्यचिकित्साशास्त्र (Plastic Surgery) ची २ पदं, बालरोगशल्यचिकित्साशास्त्र (Paediatric Surgery)चे १ पदं आणि ह्यदयवाहिका व उरोविकृती शल्यचिकित्साशास्त्र (Cardio Vascular and Thoracic Surgery) चे १ पद अशी १६ पदे भरली जाणार आहेत. वयोमर्यादा १ डिसेंबर २०२१ पर्यंत उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे. कमाल वयामध्ये मागासवर्गीय, विशेष क्रीडा प्राविण्य, माजी सैनिक आणि दिव्यांग उमेदवारांना विशेष सवलत देण्यात आली आहे. शैक्षणिक आर्हता भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडून ७ जून २०१९ आणि १२ फेब्रुवारी २०२० च्या नोटिफिकेशननुसार उमेदवारांची शैक्षणिक आर्हता आणि अनुभव असणे आवश्यक आहे. जाहिरातीमध्ये याचा सविस्तर तपशिल देण्यात आला आहे. शैक्षणिक आर्हता आणि अनुभवासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ग्राह्य धरली जाईल. पगार या पदासाठी १ लाख ४४ हजार २०० ते २ लाख १८ हजार २०० रुपयांपर्यंत वेतनश्रेणी असेल. नियम आणि अटी निवड झालेल्या उमेदवाराला किमान ५ वर्षे सेवा करणे बंधनकारक आहे. तसा करार उमेदवाराला करावा लागेल. या नियमांचा भंग झाल्यास १० हजार रुपये किंवा शासनाने निश्चित केलेली रक्कम दंड म्हणून भरावी लागेल. निवड झालेल्या उमेदवाराची महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम १९६५ अंतर्गत नोंदणी असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रिया जाहीरातीमध्ये देण्यात आलेली शैक्षणिक आर्हता, अनुभव पाहून उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. यामध्ये ४१ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळालेल्या उमेदवाराचा शिफारसीसाठी विचार केला जाणार आहे. अर्जाबाबत अर्ज केवळ ऑनलाइन माध्यमातून स्वीकारले जाणार आहेत. यासंदर्भातील सविस्तर माहिती https://ift.tt/3oZLYzp आणि https://mpsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. उमेदवाराच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांसदर्भातील माहिती https://mpsc.gov.in वेबसाइटवर उपलब्ध आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ६ ऑगस्टपासून २६ ऑगस्ट रात्री १२ वाजेपर्यंत अर्ज करु शकतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lHK2fh
via IFTTT

Post a Comment

0 Comments