Also visit www.atgnews.com
NEET 2021: एनटीएतर्फे B.Sc नर्सिंग कोर्स प्रवेशासाठी नोटिफिकेशन जाहीर
BSc Nursing admission 2021: नॅशनल टेस्टिंग एजन्सी, एनटीए (National Testing Agency, NTA)ने नर्सिंग कोर्स (B.Sc. )मध्ये प्रवेशासाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. ज्या उमेदवारांना नीट यूजी परीक्षेच्या माध्यमातून बीएससी नर्सिंग कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा असेल ते अधिकृत वेबसाइट nta.ac.in संपूर्ण माहिती तपासू शकतात. या कोर्समध्ये प्रवेशासाठी उमेदवाराकडे पीसीबी (भौतिक, रसायन विज्ञान आणि जीव विज्ञान) आणि इंग्रजी विषयांसहित बारावी पास असणे गरजेचे आहे. उमेदवाराला बारावीच्या परीक्षेत किमान ४५ टक्के असणे गरजेचे आहे. बीएससी नर्सिंग प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १७ वर्ष असावे. तसेच राज्य सरकारकडून मान्यता प्राप्त स्टेट ओपन स्कूल आणि केंद्र सरकारच्या नॅशनल इंस्टिट्यूयट ऑफ ओपन स्कून (NIOS) मधून असतील आणि ज्यांनी विज्ञान आणि इंग्रजी हा विषय निवडला असेल तर ते देखील यासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. आरक्षणाच्या नियमाअंतर्गत (BSc Nursing Reservation Policy) दिव्यांग उमेदवारांना ३ टक्के आरक्षण मिळेल. एनटीएने दिलेल्या माहितीनुसार हे नियम इंडियन नर्सिंग काऊन्सिल (INC)तर्फे बनविण्यात आले आहेत. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना या कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी विविध नर्सिंग कॉलेज आणि संस्थांचा (Nursing Colleges in India) क्रायटेरिया समजून घ्यायला हवा. साठी अर्ज करताना बीएससी नर्सिंगमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट २०२१ परीक्षेसाठी अर्ज करावा लागेल. एनटीएने नीट अर्जाची तारीख वाढवून १० ऑगस्ट २०२१ (संध्याकाळी ५ वाजेपर्यंत) केली आहे. या परीक्षेसंदर्भातील अधिक माहितीसाठी तुम्हाला ०११-४०७५९००० किंवा ईमेल आयडी Email ID- neet@nta.ac.in वर संपर्क साधावा लागेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xsuyxZ
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments