Also visit www.atgnews.com
NEP 2020 मुळे विद्यार्थ्यांना आवड, कौशल्यांना वाव देणारे करिअर निवडता येणार: प्रधान
नवी दिल्ली: मोदी सरकारने पुढाकार घेत साकारलेलं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० () विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे आणि त्यांच्या अंगभूत गुणांना वाव देणारे करिअर निवडण्याची क्षमता देणारं आहे, अशा शब्दांत केंद्रीय शिक्षणमंत्री यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची स्तुती केली. बेनेट विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षांत समारंभाप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय शिक्षण धोरणाबाबत जनजागृती करण्यासाठी बेनेट विद्यापीठाने केलेल्या कार्याचं कौतुक धर्मेंद्र प्रधान यांनी केलं. ते म्हणाले, 'राष्ट्रीय शिक्षण धोरणात शिक्षणाचं जसं उद्दिष्टं आहे, तशाच पद्धतीचं बहुपर्यायी स्वरुपाचं शिक्षण देण्याचं काम करत आहे, याचा मला आनंद आहे. विद्यापीठाने राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अंगिकार करण्यासाठी एक समितीही स्थापन केली आहे, हे कौतुकास्पद आहे.' अकॅडमिक क्रेडिट बँक्ससारख्या योजना, विद्यार्थ्यांना शिक्षणाचे विविध पर्याय देण्याचा प्रयत्न, राष्ट्रीय शिक्षण तंत्र फोरम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या अधिक बळकट करणारं वातावरण देशात तयार होत आहे, असेही प्रधान म्हणाले. शिक्षणमंत्री म्हणाले की योग्य फॅकल्टी, प्रसिद्ध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये पब्लिकेशनच्या मजबूत रेकॉर्डसह बेनेट युनिव्हर्सिटीच्या फॅकल्टी आणि विद्यार्थ्यांनी १८ पेटंट फाइल केले आहेत. हे विद्यापीठाचं खूप मोठं यश आहे. विद्यापीठाचे ४१२ विद्यार्थी पदवीधर झाले आहेत. प्रधान यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या कठोर मेहनतीचं हे यश आहे, हा त्यांचा दिवस आहे, असंही शिक्षणमंत्र्यांची आवर्जून सांगितलं. बेनेट, कोलमन अँड कंपनी लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि बेनेट विद्यापीठाचे कुलपती विनीत जैन आपल्या भाषणात म्हणाले, 'एक सुपरपॉवर म्हणून भारताचं भविष्य शिक्षण आणि रोजगारक्षमतेवर अवलंबून आहे. धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणासोबतच कौशल्य विकास आणि आंत्रप्रिनरशीप या विभागाची धुरा देऊन या विभागांना एकमेकांशी जोडण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून त्यांची दूरदृष्टी दिसते.' विद्यार्थ्यांना तांत्रिक सहाय्याने एक उत्तम टीचिंग-लर्निंग प्लॅटफॉर्म देण्याची बेनेट विद्यापीठाची क्षमता आहे. लॉकडाऊनमध्येदेखील विद्यार्थ्यांना इंटर्नशीप्स, प्लेसमेंट आणि उच्च शिक्षणाची संधी देणाऱ्या विद्यापीठाने युवा सबलीकरणासाठी आपलं योगदान दिलं आहे, असेही जैन म्हणाले. 'भारतात खासगी शैक्षणिक संस्था महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत, आणि बेनेट विद्यापीठ त्यात आघाडीवर असल्याचा मला अभिमान आहे. सर्वसमावेशकता आणि उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील जास्तीत जास्त घटकांपर्यंत पोहोचण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न राहील. विद्यापीठ राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ला अभिप्रेत मूल्यांचाही अंगिकार करेल,' अशी ग्वाही जैन यांनी दिली. पाच विद्यार्थांना यावेळी चॅन्सेलर मेडल देऊन गौरविण्यात आले. हार्दिक अगरवाल (BBA)याने सुवर्णपदक पटकावले. सेजट भटनागर (BBA), सिद्धांत अय्यर (BTech), आदित्य मिश्रा (BA,J&MC) आणि तुनप पॉल (BTech) यांना रौप्य पदकांनी गौरविण्यात आले. २०२१ च्या बॅचमधील नऊ विद्यार्थ्यांनी कुलगुरु सुवर्ण पदक पटकावले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CvfxiR
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments