'शैक्षणिक नुकसानातून सावरण्यासाठी शालेय व्यवस्थापनात सकारात्मक बदल होणार'

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काळात झालेल्या विद्यार्थ्यांप्रती चिंता व्यक्त केली आहे. देशभरात करोना वायरसमुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे शालेय शिक्षण आणि विद्यार्थ्यांना मोठे नुकसान पोहोचले. या नुकसानातून सावरण्यासाठी शिक्षण मंत्रालयातर्फे शालेय व्यवस्थापनात अनेक सकारात्मक बदल होणार आहेत. शिक्षण मंत्रायलाद्वारे शालेय व्यवस्थेत बदल होण्याच्या प्रक्रियेअंतर्गत एनसीईआरटी देशभरातील शाळेमध्ये शिक्षकांना झालेल्या नुकसानीचे आकलन करणार आहे. सोबतच लाखो विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी रोडमॅप तयार करेल. लॉकडाऊन स्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान झाले हे तज्ञांनी देखील मान्य केले आहे. या कारणामुळेच शिक्षण विभागाने अधिकांश संस्थांना डिस्टन्स लर्निंग कोर्सची(Distance Learning Course) परवानगी दिली. सर्व्हेच्या माध्यमातून होईल भरपाई एनसीईआरटीद्वारे साधारण ३५ लाख विद्यार्थ्यांचे आकलन केले जाणार आहे.एनसीईआरटी म्हणजेच राष्ट्रीय राष्ट्रीय शैक्षिक अनुसंधान आणि प्रशिक्षण परिषद ३,५,८ आणि दहावीच्या मुलांना शिकण्याच्या पर्यायाचे आकलन करण्यासाठी राष्ट्रीय नमून सर्व्हेक्षणाचे आयोजन केले जाते. तसेच शाळेतील सामाजिक आर्थिक स्थितीचे एनसीईआरटीद्वारे सर्व्हेक्ष केले जाणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या माहितीनुसार शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दक्षतेसाठी हे आकलन यावर्षी नोव्हेंबरमध्ये होऊ शकते असे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. करोना महामारी पाहता एनसीईआरटीने निष्ठा कार्यक्रमास दीक्षा प्लॅटफॉर्मवर प्रारंभिक स्तरावर ऑनलाइन सुरु केले आहे. २०२१-२२ मध्ये सेकेंडरी आणि हायर सेकेंडरी शिक्षक आणि प्राथमिक शिक्षकांसाठी मूलभूत साक्षरता आणि संख्या ज्ञानावर निष्ठा कार्यक्रम घेतला जाणार आहे. तर एनसीईआरटीने शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये सुधार आणण्यासाठी शाळा प्रमुख आणि शिक्षकांच्या उन्नतीसाठी क्षमता निर्माण कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. करोना काळात दीक्षा प्लॅटफॉर्मवर २ हजार ३०० कोटीहून अधिक हिट्स झाले. शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार यावर दरदिवशी ५ कोटी हिट्स होत आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर विशेषत: मूक बधिर आणि दृष्टीबाधितांसाठी डिजीटल रुपात सोपी प्रणाली असणारी वेबसाइट आणि सांकेतिक भाषा असलेली नवी सामग्री विकसित केली जात आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Xb72t9
via IFTTT

Post a Comment

0 Comments