SSC SI Answer Key 2019: एसएससी एसआय उत्तरतालिका जाहीर, ९ ऑगस्टपर्यंत नोंदवा आक्षेप

2019: कर्मचारी निवड आयोग () एसएससीने सब इन्स्पेक्टर किंवा एसएससी एसआय (Sub Inspector or ) ची उत्तरतालिका जाहीर केली आहे. आयोगाने दिल्ली पोलीसमध्ये एसआय, सीएपीएफ आणि सीआयएसएफमध्ये एएसआय भरतीसाठी घेण्यात आलेली परीक्षा (पेपर II), २०१९ ची उत्तरतालिका अधिकृत वेबसाइट ssc.nic.in जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहभागी झालेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करुन आपले गुण तपासू शकता. उमेदवारांना उत्तरतालिकेवर काही आक्षेप असल्यास ते आपला आक्षेप नोंदवू शकतात. ९ ऑगस्ट संध्याकाळी ६ वाजेपर्यंत यासाठी वेळ देण्यात आला आहे. यानंतर आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. ही प्राथमिक उत्तरतालिका असून अंतिम उत्तरतालिका नंतर जाहीर केली जाणार आहे. अंतिम उत्तरतालिकेविषयीची अपडेट एसएसच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात येईल. महत्वपूर्ण तारखा उत्तरतालिका जाहीर होण्याची तारीख- ६ ऑगस्ट २०२१ SSC SI उत्तरतालिका आक्षेप नोंदविण्याची सुरुवात- ९ ऑगस्ट २०२१ SSC SI उत्तरतालिका आक्षेप नोंदविण्याची अंतिम तारीख- ९ ऑगस्ट २०२१ SSC SI Answer Key 2019: उत्तरतालिका अशी तपासा अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जा. यानंतर होमपेजवर एसआय उत्तरतालिकेच्या लिंकवर क्लिक करा. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. यानंतर एक नवे पेज ओपन होईल. यावर तुमचा परीक्षेचा रोल नंबर आणि पासवर्ड नोंदवा. यानंतर उत्तरतालिकेच्या पर्यायावर क्लिक करा. एक पीडीएफ ओपन होईल. यानंतर उत्तरतालिका डाऊनलोड करा. आपल्या उत्तर पत्रिकेसोबत पडताळणी करा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iuOOeo
via IFTTT

Post a Comment

0 Comments