Also visit www.atgnews.com
मुंबई विद्यापीठाच्या पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर
MU : मुंबई विद्यापीठाच्या विविध प्रकारच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया १२ ऑगस्ट २०२१ पासून सुरू होणार आहे. यात एम.कॉम, एम.एससी., एम.ए. अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विद्यापीठाने या प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १२ ऑगस्ट २०२१ पासून ही प्रक्रिया सुरू होऊन ७ सप्टेंबर २०२१ पर्यंत संपणार आहे. १५ सप्टेंबर २०२१ पासून विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होतील. ज्या उमेदवारांना या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घ्यायची इच्छा आहे, ते uom-admissions.mu.ac.in या विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करू शकतात. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी १२ ऑगस्ट २०२१ पासून हे पोर्टल सुरू होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे - ऑनलाइन नोंदणी आणि अॅप्लिकेशन फॉर्म सबमिट करणे - १२ ऑगस्ट २०२१ ते २६ ऑगस्ट (सायंकाळी ५ पर्यंत) ऑनलाइन कागदपत्र पडताळणी - २६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२१ (सकाळी ११ वाजेपर्यंत) तात्पुरती गुणवत्ता यादी - ३० ऑगस्ट २०२१ (सायंकाळी ६ पर्यंत) विद्यार्थ्यांचे तक्रार निवारण - ३१ ऑगस्ट २०२१ अंतिम गुणवत्ता यादी - २ सप्टेंबर २०२१ (सायंकाळी ६ पर्यंत) ऑनलाइन शुल्क भरणे - ३ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर २०२१
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CxAwSd
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments