UPSC EPFO admit card 2021: यूपीएससी ईपीएफओसाठी प्रवेश पत्र जाहीर, जाणून घ्या डिटेल्स

admit card 2021: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)५ सप्टेंबर २०२१ ला ईपीएफओ परीक्षा होणार आहे. ऑफलाइन माध्यमातून ही परीक्षा होणार आहे. इन्फोर्समेंट ऑफिसर (Enforcement Officers) आणि अकाऊंट्स ऑफिसर (EPFO Accounts Officer)च्या एकूण ४२१ पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी प्रवेश पत्र जाहीर करण्यात आले आहे. यासाठी मोठ्या संख्येत अर्ज करण्यात आले होते. ही परीक्षा ४ ऑक्टोबर २०२० ला होणार होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा स्थगित करण्यात आली. यूपीएससी या महिन्यात ईपीएफओ परीक्षेसाठी प्रवेश पत्र जाहीर करणार आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर लक्ष देणे गरजेचे आहे. UPSC EPFO admit card: असे करा डाऊनलोड स्टेप १- अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा स्टेप २- होमपेजवर 'यूपीएससी ईपीएफओ प्रवेश पत्र' या लिंकवर क्लिक करा. स्टेप ३- स्क्रीनवर नवे पेज खुले होईल. स्टेप ४ - आपली शाखा नोंदवा आणि सबमिटवर क्लिक करा स्टेप ५- यूपीएससी ईपीएफओ प्रवेश पत्र स्क्रिनवर दिसेल. स्टेप ६ - डाऊनलोड करा आणि भविष्यासाठी प्रिंटआऊट काढा यूपीएससीतर्फे पेन अॅण्ड पेपर माध्यमातून या परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. अभ्यासक्रमामध्ये सामान्य इंग्रजी, भारतीय स्वतंत्रता संग्राम, वर्तमान घटना आणि विकासासंबंधी मुद्दे, भाारतीय राजकारण आणि अर्थव्यवस्था, सामान्य लेखा सिद्धांत, औद्योगिक संबंध आणि कामगार कायदा, सामाजिक संरक्षण अशा विषयांचा समावेश असेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AwgJAv
via IFTTT

Post a Comment

0 Comments