राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत विविध पदांची भरती

NCL : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथील प्रशासकीय विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या पदभरतीसाठी इच्छुक उमेदवारांनाकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आला आहे. पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत प्रकल्प सहयोगी (Project Associate) आणि वरिष्ठ प्रकल्प सहयोगी ( Senior Project Associate) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. प्रकल्प सहयोगी (Project Associate) पदाच्या ६ जागा भरण्यात येणार आहेत. या पदासासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून नॅचरल किंवा अॅग्रीकल्चर सायन्समधील मास्टर डिग्री किंवा इंजिनीअरिंग/ टेक्नॉलॉजी/मेडीसिनमधील पदवी असणे गरजेचे आहे. संबंधित क्षेत्रातील क्लोनिंग आणि प्रोटीनप्युरिफिकेशनचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी ३५ वर्षे इतकी वयोमर्यादा असणे गरजेचे आहे. निवड झालेल्या उमेदवारास ३१ हजार दरमहा इतका पगार दिला जाईल. वरिष्ठ प्रकल्प सहयोगी ( Senior Project Associate) पदाच्या २ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून नॅचरल किंवा अॅग्रीकल्चर सायन्समधील मास्टर डिग्री किंवा इंजिनीअरिंग/ टेक्नॉलॉजी/मेडीसिनमधील पदवी असणे गरजेचे आहे.औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात संशोधन आणि विकास संस्था किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेत ४ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानमध्ये दोन वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. दिनांक ७ ऑक्टोबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अर्ज करण्यापुर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचणे गरजेचे आहे. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ump2NM
via IFTTT

Post a Comment

0 Comments