Also visit www.atgnews.com
Schools Reopening 2021: स्कूलबस चालकांमध्ये संभ्रम, नाराजीही
म. टा. प्रतिनिधी मुंबई : राज्यात सुरू करण्याच्या घोषणेनंतर आनंद व्यक्त करण्यात येत असला, तरी विद्यार्थी वाहतूक करण्याविषयी राज्य सरकारने कोणत्याही प्रकारच्या मार्गदर्शक सूचना काढलेल्या नाहीत. त्यामुळे स्कूलबस चालकांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. दीड वर्षानंतर शाळा सुरू होत असताना, करोनासंबंधी मार्गदर्शक सूचनांशिवायच विद्यार्थ्यांची ने-आण करावी लागणार असल्याचे स्कूलबस चालकांचे म्हणणे आहे. मार्च २०२०पासून बंद असलेल्या मुंबईतील शाळा ४ ऑक्टोबरपासून खुल्या होणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. मुंबईत शाळा रोज उघडणार की एक दिवसाआड याचा निर्णय तूर्त झालेला नाही. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बस अनेक महिन्यापासून बंद अवस्थेत आहे. काही गाड्यांचा फिटनेस, विमा, पीयूसी यांची मुदत संपलेली आहे. करोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या स्कूलबस चालकांना सरकारने आर्थिक मदत करावी आणि शाळा सुरू करण्याआधी शालेय बस संघटनेशी बैठक घ्यावी, या दोन मागण्या संघटनेकडून वारंवार करण्यात येत होत्या. मात्र मदत तर दूरच, परंतु साधी बैठकही घेण्यात आलेली नाही. विद्यार्थी वाहतूक करण्याबाबत परिवहन विभागाकडून कोणत्याही मार्गदर्शक सूचना नसल्याने एमएमआरमधील शालेय बस चालकांमध्ये नाराजी आहे, असे स्कूलबस ओनर्स असोसिएशनचे अनिल गर्ग यांनी सांगितले. सरकारकडून मदतीची अपेक्षा होती, मात्र सरकारने जबाबदारी झटकली. आता शून्यापासून सुरुवात करावी लागेल. मुळात शाळा सुरू झाल्यानंतर पूर्वीप्रमाणे विद्यार्थी स्कूलबसकडे येतील का , हा प्रश्न आहे. स्कूलबसमध्ये पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ६० टक्के असते, तर सहावी-सातवीतील २० टक्के आणि आठवी ते दहावीतील २० टक्के विद्यार्थी असतात. विद्यार्थ्यांची वाहतूक हा शाळांचा अविभाज्य घटक आहे. याचा विसर सरकारला पडल्याचे मत व्यक्त करत, ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थी वाहतूक संघटनेचे संपर्क प्रमुख योगेश कांबळे यांनी नाराजी व्यक्त केली. वाहनाची फिटनेस चाचणी करून घेण्यासाठी वेळ लागतो. गाड्यांचे सर्व्हिसिंग, बस मदतनीस यांची जमवाजमव करण्यासाठी पुरेसा वेळही सरकारने दिलेला नाही. यामुळे शाळा सुरू झाल्यानंतरही स्कूलबस करोनापूर्व काळानुसार धावू शकतील, का याबाबत चालकांमध्ये संभ्रम आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XRtesw
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments