यूजीसीच्या 'या' शिष्यवृत्ती योजनेतून उच्च शिक्षणाचे स्वप्न होईल पूर्ण

schemes: पैशाच्या अभावामुळे कोणाला चांगले उपचार करता येत नसेल तर कोणाला चांगले शिक्षण घेता येत नाही अशा अनेक घटना आपल्या आजुबाजूला घडलेल्या दिसतात. इंजिनीअरिंग, मेडिकल आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीसमोर तडजोड करावी लागते. गुणवत्ता असूनही विद्यार्थी त्याच्या आवडत्या क्षेत्रात जाऊ शकत नाही. फी मुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये म्हणून भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे (UGC) विविध चालवल्या जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाते. एससी, एसटी विद्यार्थ्यांसाठी पीजी शिष्यवृत्ती (Postgraduate SC, ST Scholarship Scheme) इंजिनीअरिंग, मेडिकल, फार्मसी आणि इतर अभ्यासक्रमांप्रमाणे व्यावसायिक कोर्स करण्यासाठी यूजीसीतर्फे एससी आणि एसटी विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी पीजी शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये MCI, DCI, PCI, AICTE, ICAR शी संलग्न व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या कोर्सला प्रवेश घेतलेले विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. ME, MTech अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती ७,८०० रुपये, इतर अभ्यासक्रमांसाठी दरमहा ४,५०० रुपये शिष्यवृत्ती आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट Scholarship.gov.in वर जाऊन लॉगिन करावे लागेल. इशान उदय शिष्यवृत्ती (UGC Ishan Uday Scholarship) देशातील पूर्वोत्तर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ही एक विशेष शिष्यवृत्ती योजना चालविली जाते. ईशान उदय शिष्यवृत्ती असे या योजनेचे नाव आहे. एनईआर शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांसाठी वर्ष २०१४-१५ मध्ये सुरू झाली आहे. ईशान्येकडील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी समान संधी प्रदान करणे, एकूण नावनोंदणी प्रमाण (जीईआर) वाढवणे आणि व्यावसायिक शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करणे हा या शिष्यवृत्तीचा हेतू आहे. या रकमेअंतर्गत सामान्य पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा ५,४०० रुपये दिले जातात. त्याचबरोबर तांत्रिक, वैद्यकीय, पॅरामेडिकलसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी दरमहा ७,८०० रुपये दिले जातात. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२१ आहे. उमेदवारांनी वेळेवर अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी Scholarship.gov.in ला भेट द्यावी. सिंगल गर्ल चाइल्डसाठी पीजी इंदिरा गांधी शिष्यवृत्ती (PG Indira Gandhi Scholarship For Single Girl Child) मुलींना उच्च शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी UGC ने PG इंदिरा गांधी शिष्यवृत्तीसाठी सिंगल गर्ल चाइल्ड स्कीम सुरू केली आहे. ज्या मुली त्यांच्या पालकांचे एकुलते एक मूल आहेत ते या योजनेसाठी पात्र आहेत. याशिवाय, जुळ्या बहिणी देखील या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. या अंतर्गत प्रति वर्ष एकूण ३६ हजार २०० रुपये दिले जातील. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी Scholarship.gov.in ला भेट देऊन अर्ज करावा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zKXAdr
via IFTTT

Post a Comment

0 Comments