Also visit www.atgnews.com
...तोपर्यंत शिक्षकांना शाळेत येण्याची परवानगी नाही, शिक्षण विभागाचे निर्देश
Delhi : दिल्ली शिक्षण विभागाने (Directorate of Education, Delhi)शिक्षक आणि शाळेतील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. त्यानुसार, संचालनालयाने संबंधित शालेय शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना १५ ऑक्टोबरपर्यंत लसीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. लसीकरण पूर्ण न झाल्यास त्यांना शाळेत येण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचे नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच त्या दिवशी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची रजा मानली जाईल असेही सांगण्यात आले आहे. राज्य संचालनालयाने या संदर्भात नोटीस जाहीर केली आहे. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (DDMA) नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यानुसार सहावी ते आठवीच्या शाळा आता सणासुदीनंतर उघडल्या जाणार आहेत. दिवाळीत आणि इतर सणांनंतरच सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी शाळा उघडल्या जातील, असे बैठकीत सांगण्यात आले आहे. मात्र, यासंदर्भातील तारीख लवकरच ठरवली जाणार आहे. या वर्गांनंतर डीडीएमए प्राथमिक वर्ग उघडण्याचा विचार करेल. दुसरीकडे इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गांसाठी शाळा उघडण्यात आली आहे. करोना संसर्ग टाळण्यासाठी प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. दिल्लीमध्ये करोना संसर्गाची परिस्थिती पाहिली तर बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये राजधानीत करोना संसर्गामुळे एकही मृत्यू झालेला नाही. विद्यार्थ्यांच्या सीड मनीमध्ये वाढ विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच स्वावलंबी बनवण्यासाठी दिल्ली सरकारने एक अनोखा पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या अकरावी आणि बारावीच्या मुलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि उद्योजक होण्यासाठी छोटी रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्ष २०१९ मध्ये सुरू झालेल्या अभ्यासक्रमासाठी यंदा रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत, दिल्ली सरकार आता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना २ हजार रुपये देणार आहे. कोणत्याही मुलाने नोकरी मिळविण्यासाठी शाळेत जाऊ नये तर इतरांना नोकरी उपलब्ध करण्याच्या उद्धीष्टाने शाळेत जावे या हेतूने दिल्ली सरकारने दोन वर्षांपूर्वी उद्योजकता अभ्यासक्रम सुरू केल्याची माहिती दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया (Delhi Education Minister Manish Sisodia)यांनी दिली. आपण जे काम करु ते उद्योजक मानसिकतेने (entrepreneurship mindset)करु हा विश्वास मुलांमध्ये निर्माण व्हायला हवा. सुरुवातीला विद्यार्थ्यांना त्यांचा व्यवसाय सुरु करण्यासाठी १ हजार रुपयांची रक्कम देण्यात आली होती असे सिसोदिया म्हणाले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3m4E072
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments