Also visit www.atgnews.com
ICSI CS परीक्षेचा निकाल 'या' दिवशी होणार जाहीर
2021: इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने कंपनी सेक्रेटरीच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी जून २०२१ सत्राच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. २७ सप्टेंबर २०२१ रोजी संस्थेने जाहीर केलेल्या महत्त्वपूर्ण सुचनेनुसार, सीएस फाउंडेशन, कार्यकारी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल १३ ऑक्टोबर २०२१ रोजी जाहीर होणार आहेत. आयसीएसआयतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार तिन्ही अभ्यासक्रमांच्या निकालाची वेळ वेगळी ठेवण्यात आली आहे. सीएस प्रोफेशनल निकाल २०२१ सकाळी ११ वाजता जाहीर केला जाईल. तर जुन्या आणि नवीन अभ्यासक्रमासाठी सीएस एक्झिक्युटिव्ह निकाल २०२१ दुपारी २ वाजता जाहीर केला जाईल. त्यानंतर सीएस फाउंडेशन निकाल २०२१ दुपारी ४ वाजता जाहीर केला जाणार आहे. CS निकाल २०२१ कुठे आणि कसा तपासाल? निकाल आणि स्कोअर कार्ड अधिकृतपणे नियोजित तारखेला आणि वेळेवर जाहीर केल्यानंतर उमेदवार निकाल पाहू शकतात. सीएस फाउंडेशन, एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल कोर्सच्या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना आयसीएसआयची अधिकृत वेबसाइट icsi.edu वर निकाल पाहता येणार आहे. उमेदवारांनी वेबसाइटवरील एक्झाम सेक्शनमध्ये जावे. तिथे निकाल तपासण्यासाठी लिंक सक्रिय केली जाईल. येथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा कोड एन्टर करु सबमिट बटणावर क्लिक करा. तुमचा रिझल्ट स्क्रीनवर दिसेल. रिझल्ट डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट घ्या. उमेदवार अधिकृत वेबसाइटicsi.edu वर निकालांविषयी अधिक तपशीलवार माहिती मिळवू शकतात. सध्याच्या करोना परिस्थितीमुळे जून २०२१ सत्राची परीक्षा ICSI ने पुढे ढकलली होती. फाऊंडेशनची परीक्षा १३ आणि १४ ऑगस्ट तसेच ११ आणि १२ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. व्यावसायिक आणि एक्झिक्युटिव्ह परीक्षा १० ते २० ऑगस्ट २०२१ दरम्यान घेण्यात आली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zMX6DI
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments