MHAGENCO: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत विविध पदांची भरती

Recruitment 2021: लिमिटेड मुंबईच्या प्रशसाकीय विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदाची शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, पगार, अनुभव याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये विविध पदांच्या आठ जागा भरण्यात येणार आहे. या अंतर्गत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (Assistant Medical Officer), अतिरिक्त जनसंपर्क अधिकारी (Additional Public Relations Officer) आणि सहाय्यक कल्याण अधिकारी (Assistant Welfare Officer) पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (Assistant Medical Officer)पदाच्या ३ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवाराकडे मान्यतप्राप्त संस्थेतून एमबीबीएसची डिग्री असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास ५५ हजार ते १ लाख २० हजारपर्यंत पगार देण्यात येईल. अतिरिक्त जनसंपर्क अधिकारी (Additional Public Relations Officer) पदाची १ जागा भरण्यात येणार आहे. यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेतून पत्रकारिता क्षेत्रातील फर्स्ट क्लाससह पदवी असणे गरजेचे आहे. इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. यासाठी उमेदवाराला ६८ हजार ते १ लाख ५४ हजारपर्यंत पगार मिळू शकेल. सहाय्यक कल्याण अधिकारी (Assistant Welfare Officer) पदाच्या ४ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवाराकडे २ वर्षांचा मास्टर ऑफ सोशल वर्क/मास्टर ऑफ लेबर स्टडीज, पोस्ट ग्रॅज्युएशन इन लेबर स्टडीज/ डिप्लोमा इन सोशल वर्क/ डिप्लोमा इन लेबर वेल्फेअर असणे गरजेचे आहे. या पदासाठी उमेदवाराकडे ५५ हजार ते १ लाख २० हजारपर्यंत पगार मिळू शकेल. उमेदवारांनी दिलेल्या नमुन्यानुसार अर्ज भरायचा आहे. तसे नसल्यास अर्ज बाद करण्यात येईल. उमेदवारांनी ८०० रुपये किंमतीची पे ऑर्डर / डिमांड ड्राफ्ट 'महाराष्ट्र राज्य पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड' च्या नावे द्यावा. मागील बाजूस स्वत:चे पूर्ण नाव लिहावे. पोस्टल ऑर्डर/मनी ऑर्डर/रोख स्वरूपात शुल्क स्वीकारली जाणार नाही. एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही, किंवा कोणत्याही पुढील भरतीसाठी राखीव ठेवले जाणार नाही. उमेदवारांनी आपला अर्ज, संबंधित कागदपत्र, सध्याचा पासपोर्ट साइज फोटो,पे ऑर्डर / डिमांड ड्राफ्ट यासह सहाय्यक. महाव्यवस्थापक (HR-RC), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड, एस्ट्रेला बॅटरीज विस्तार कंपाऊंड, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई ४०००१९ या पत्त्यावर पाठवावा. १५ ऑक्टोबरपर्यंत आलेल्या अर्जांचा विचार केला जाईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZEUjQD
via IFTTT

Post a Comment

0 Comments