Also visit www.atgnews.com
Schools Reopening: देशातील शाळा सुरु करताना ICMR ने दिले महत्वाचे निर्देश
Schools Reopening: देशभरातील प्राथमिक शाळा पुन्हा सुरू करण्याचा सल्ला इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च () दिला आहे. आयसीएमआरच्या पीअर-रिव्ह्यू मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका पेपरमध्ये विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तापमान तपासणीऐवजी नियमित कोविड चाचणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या तज्ञांच्या मते, करोना रोखण्यासाठी बहुस्तरीय उपायांचा अवलंब करून प्राथमिक वर्गांपासून टप्प्याटप्प्याने शाळा पुन्हा उघडल्या पाहिजेत. 'द इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च' मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात, तज्ञांनी युनेस्कोच्या अहवालाचा हवाला दिला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, ५०० हून अधिक दिवसांपासून शाळा बंद असल्यामुळे भारतातील ३२ कोटीहून अधिक विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. या लेखात शाळा उघडण्याच्या मुद्द्यावर भारत आणि परदेशातून मिळालेल्या वैज्ञानिक पुराव्यांच्या आधाके तज्ञांनी लिहिले आहे. त्यानुसार शाळांमध्ये नियमित संसर्ग तपासणी करुन विषाणूचा प्रसार रोखला जाऊ शकतो. तनु आनंद, बलराम भार्गव आणि समीरन पांडा यांच्यामते, करोनापूर्व काळापूर्वीच्या शिक्षण व्यवस्थेप्रमाणे कामकाज पूर्ववत करणे हेच सध्याच्या भारतीय परिस्थितीत महत्वाचे पाऊल राहील असे यात म्हटले आहे. तज्ञांच्या मते, शालेय शिक्षक, कर्मचारी आणि मुलांच्या वाहतुकीशी संबंधित लोकांनी लसीकरण केले पाहिजे. लसीचा डोस मिळाल्यानंतरही त्यांनी मास्क वापरावा अशा सूचनाही यातून देण्यात आल्या आहेत. राज्यात ४ ऑक्टोबर पासून शाळा कोरोनाच्या काळात बंद अलेल्या शाळा ४ ऑक्टोबर पासून सुरु होणार अशी महत्त्वपुर्ण घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षणविभागाने शाळांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. राज्यात ग्रामीण भागात पाचवी ते बारावी, तर शहरी भागात आठवी ते बारावीच्या शाळेचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरु करण्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. टास्कफोर्सकडून सूचना शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यासोबतच टास्कफोर्सने शाळा सुरु करताना काही सूचना केल्या आहे. शिक्षणविभागातर्फे या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. पालकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळीज घेण्याची सुचना शिक्षण मंत्र्यांनी दिल्या आहेत. पालकांची परवानगी आवश्यक शाळा सुरु करताना पालकांची मंजुरी आवश्यक आहे. शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे लसीकरण सक्तीचे आहे. कोरोना संसर्गाच्या पाश्वभुमीवर मास्क, सॅनिटायझर व शारीरिक अंतर या सुचनाचे पालन सर्वांनाच करावे लागणार असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZCtPzg
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments