Also visit www.atgnews.com
दोन दिवसात कॉलेज सुरु करण्याचा निर्णय घेणार, शिक्षणमंत्र्यांची घोषणा
College Reopening 2021: राज्यातील शाळा सुरु झाल्यानंतर कॉलेज कधी सुरु होणार असा प्रश्न विचारला जात होता. दिवाळीनंतर कॉलेज सुरु करण्यात येतील अशी माहिती शिक्षणविभागाकडून देण्यात आली होती. पण आता उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. येत्या दोन दिवसात महाराष्ट्रातील सर्व कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे उदय सामंत म्हणाले. त्यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली. दोन दिवसात निर्णय घेऊन तारीख जाहीर नक्की करणार असल्याचे शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले. शिक्षण विभागातर्फे यासंदर्भातील प्रस्ताव मदत व पुनर्वसन प्रधान सचिवांना पाठवण्यात आला आहे. त्यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार आहे. राज्यातील काही महाविद्यालयांच्या संकुलात करोनाबाधित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष असल्याने, महाविद्यालय सुरू करण्यास अडचणी येत आहेत. याबाबत येत्या आठवड्यात आढावा घेउन महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेऊ असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले. विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत नुकतीच बैठक झाली आहे. त्यामध्ये विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याचा अहवाल काही दिवसांत सादर करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. पुण्यातील कॉलेज सुरु होण्याबाबत साशंकता राज्यातील ग्रामीण भागात पाचवी ते बारावीच्या शाळा, तर शहरी भागात आठवी ते बारावीच्या शाळा उत्साहात सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ११ ऑक्टोबरपासून पुणे जिल्ह्यातील विद्यापीठे, कॉलेज सुरू होतील, असा निर्णय जाहीर केला. त्यानुसार पुणे महापालिकेने 'महाराष्ट्र बंद'च्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून महाविद्यालये, विद्यापीठे सुरू करण्याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. मात्र, उच्च व तंत्रशिक्षण विभागाने महाविद्यालये, विद्यापीठे सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय प्रसिद्ध केलेला नाही. त्यामुळे राज्याच्या उच्च शिक्षण संचालनालयाला पुणे विद्यापीठासोबत इतर अकृषी विद्यापीठांना आदेश देता येत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाला उच्च व तंत्रशिक्षण विभाग किंवा उच्च शिक्षण संचालनालयाचे कॉलेज सुरू करण्याबाबत कोणतेही आदेश मिळाले नाहीत. त्यामुळे विद्यापीठालाही संलग्न कॉलेज सुरू होण्यासाठी नियमावली प्रसिद्ध करता येत नसल्याचे चित्र आहे. या सर्व गोंधळामुळे मंगळवारी १२ ऑक्टोबरला कॉलेज सुरू होण्याबाबत साशंकता आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DvDpm7
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments