Also visit www.atgnews.com
SSC Stenographer Exam: स्टेनोग्राफर परीक्षेची तारीख जाहीर
SSC : कर्मचारी निवड आयोग (SSC) ने स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी भरती परीक्षा 2019 ( Stenographer Recruitment exam 2019) च्या स्किल टेस्टच्या तारखेची घोषणा केली आहे. आयोगाने (SSC) २१ आणि २२ ऑक्टोबर या दोन दिवशी स्टेनोग्राफर स्किल टेस्ट आयोजित करणार आहे. उमेदवार एसएससीच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन स्किल टेस्टची तारीख तपासू शकतात. एसएससी द्वारे जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, 'आयोग उमेदवारांच्या सोयीसाठी आपल्या अधिकृत वेबसाइट वर स्टेनोग्राफर टेस्ट ची डेमो लिंकही अपलोड करणार आहे.' आयोगाने एसएससी स्टेनोग्राफर एक्झाम २०१९ स्किल टेस्ट डेटसह आवश्यक दिशानिर्देशही जारी केले आहेत. हे दिशानिर्देश पुढीलप्रमाणे - परीक्षेसाठी कॉम्प्युटर, किबोर्ड आणि शॉर्टहँड नोटबुक देण्यात येईल, कोणत्याही उमेदवाराला आपला की-बोर्ड आणण्याची परवानगी देण्यात येणार नाही. स्टेनोग्राफी स्किल टेस्ट (ट्रान्सक्रिप्शन) नंतर टाइप केलेल्या टेक्स्टचं प्रिंट आऊट घेतलं जाणार नाही. इंग्रजी ट्रान्सक्रिप्शन (टायपिंग) , उमेदवारांना सल्ला दिला जातो की त्यांनी आपल्या कीबोर्ड लेआउट पर्यायाच्या रुपात इंग्रजी (यूएस) पर्याय निवडा. वीएच (VH) उमेदवार जे आपला ब्रेल टाइपराइटर आणतील, त्यांना एक स्वतंत्र सीट दिली जाईल. उमेदवार परीक्षेसाठी आपलं स्वत:चं पेन/पेन्सिल/शार्पनर/इरेझर आणावं. उमेदवारांना दिलेल्या वेळेतच ट्रान्सक्रिप्शन (टाइपिंग) पूर्ण करायचं आहे, शॉर्टहँड डिक्टेशनसाठी अतिरिक्त वेळ मिळणार नाही. एसएससी स्टेनोग्राफर भरती परीक्षा २०१९ ही संगणक आधारित परीक्षा (CBT) २२ ते २४ डिसेंबर २०२० या दोन दिवशी देशभर विविध केंद्रांवर आयोजित केली गेली होती. या भरती अभियानाच्या (SSC Jobs) माध्यमातून केंद्र सरकारच्या मंत्रालय/विभाग/संस्थांमध्ये स्टेनोग्राफर च्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YPzy4u
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments