Also visit www.atgnews.com
कोकण रेल्वेमध्ये विविध पदांवर भरती, जाणून घ्या तपशील
Apprentice: कोकण रेल्वेमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या पदभरती अंतर्गत सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन, मेकॅनिकल आणि सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल या पदांवर प्रशिक्षणार्थी पदांची भरती केली जाणार आहे. या विविध पदांची एकूण १३९ पदे भरली जाणार आहेत. यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे. प्रशिक्षणार्थी पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. आलेल्या अर्जांची पडताळणी करुन त्यातील गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवारांना आधीच्या परीक्षेत मिळालेले गुण पाहिले जाणार आहेत. यासाठी उमेदवारांची कोणतीही मुलाखत किंवा लेखी परीक्षा होणार नाही. या भरतीअंतर्गत निवड झालेल्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांना महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यात अप्रेंटिस करावी लागणार आहे. कोकण रेल्वेत अप्रेंटिससाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २२ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचणे गरजेचे आहे. अर्जात काही त्रुटी आढळल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट https://ift.tt/3kUZbsE वर जाऊन अर्ज करायचा आहे. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०० रुपये शुल्क द्यावा लागणार आहे. तर मागासवर्ग आणि महिला उमेदवारांना शुल्कातून सवलत देण्यात येणार आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये भरती इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना एनटीपीसीमध्ये सरकारी नोकरी मिळण्याची संधी आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) तर्फे एक्झिक्युटिव्ह पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. एनटीपीसीतर्फे हायड्रो एक्झिक्युटिव्हच्या पदांवर ही भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. थेट मुलाखतीतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. एनटीपीसीतर्फे यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदांसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अनुभव, थेट मुलाखतीचा तपशील नोटिफिकेशन देण्यात आला आहे. यासोबतच अर्जाचा नमुना देखील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या पदभरतीअंतर्गत एक्झिक्युटिव्ह (हायड्रो) पदांच्या १५ जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी पात्र उमेदवारांना ६० हजार रुपये पगार दिला जाणार आहे. यासोबतच उमेदवारांना इतर भत्ते देखील देण्यात येणार आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xpNtev
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments