Also visit www.atgnews.com
चिमुकल्यांची सुरक्षितता आणि आरोग्यदायी वातावरणाला प्राधान्य: शिक्षणमंत्री
जे विद्यार्थी यंदा पहिली आणि दुसऱ्या इयत्तेत शिकत आहेत, त्यांचे शालेय जीवन सुरू झालेले असले तरी त्यांनी शाळा अद्याप पाहिलेलीच नाही. वर्ग काय असतो, सोबतचे विद्यार्थी, शिक्षक हे वातावरण त्यांच्यासाठी खूप नवे असणार आहे. त्यामुळे हे विद्यार्थी शाळेत येत असताना त्यांच्या सुरक्षितता आणि आरोग्यदायी वातावरणाला प्राधान्य देणार असून, त्यांच्यासाठी निकोप वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करणार असे, शालेय शिक्षणमंत्री यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी राज्यातील प्राथमिक इयत्तांचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. १ डिसेंबरपासून राज्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू होणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयासंबंधी विस्तृत माहिती दिली. गायकवाड म्हणाल्या, 'राज्यातील शाळा सुरू करण्यासंबंधी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्य विभाग, मुख्य सचिव, पेडिअॅट्रिक टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केली होती आणि शाळा सुरू करण्यासंबंधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला होता. गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून सर्वांनी हा निर्णय घेतला. येत्या १ डिसेंबरपासून शाळांचे उर्वरित सर्व वर्ग सुरू होणार आहेत. त्यासाठीच्या तयारीसाठी आम्ही आठ दिवस मागितले होते. त्यानुसार १ डिसेंबरपासून शाळा सुरू होतील.' 'दोन वर्षांपूर्वी जी मुलं पहिलीला येणार होती, त्यांनी अद्याप शाळेची इमारतही पाहिली नाही. तसेच पहिली ते चौथी या इयत्तांना असलेल्या विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणात एकदम दोन वर्षांचा खंड पडला आहे. त्यामुळे ही मुले मुख्य प्रवाहाबाहेर फेकली जाऊ शकतात. त्यामुळे त्यांच्यासाठी तातडीने शाळा सुरु करणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांच्या समितीने व्यक्त केले होते. म्हणूनच राज्य शासनाने हा निर्णय घेतला,' असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या. वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'या मुलांपैकी पहिलीतली मुलं अद्याप शाळेतच आलेली नाहीत. त्यामुळे त्यांच्या पालकांशी संवाद साधण्यात येईल. सर्व मुलांसाठी सुरक्षित, आरोग्यदायी वातावरण तयार करण्यात येईल.'
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FDE85Q
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments