MHT CET: लॉच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला सुरुवात, जाणून घ्या डिटेल्स

Law CAP 2021: राज्य प्रवेश परीक्षा कक्षा अंतर्गत उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले. दरम्यान लॉ (३ वर्षे) ची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. लॉचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील महत्वाची अपडेट अधिकृत वेबसाइटवर मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यातील शासकीय, शासकीय अनुदानित अल्पसंख्यांक, विद्यापीठ संचलित, विद्यापीठाचे विभाग, विनाअनुदानीत खासगी, विनाअनुदानित खासगी अल्पसंख्यांक महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी उमेदवारांना १० डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहे. प्रवेश घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी माहिती पुस्तिका व्यवस्थित वाचून त्यानंतर ऑनलाइन अर्ज करायचा आहे. तसेच अभ्यासक्रम राबविणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे. अधिकृत वेबसाइटवर वेळोवेळी अपडेट देण्यात येणार आहे. गुणवत्ता यादी महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (Maharashtra Common Entrance Test Cell)सीईटीची पहिल्या फेरीतील प्रवेशांची गुणवत्ता यादी ( Merit List 2021) बुधवार २४ नोव्हेंबर २०२१ रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थी या यादीबाबतच्या त्यांच्या हरकती वा तक्रारी २५ ते २७ नोव्हेंबर पर्यंत नोंदवू शकतात. ही गुणवत्ता यादी कक्षाच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली जाणार आहे. ही यादी जाहीर झाल्यावर विद्यार्थी ती cetcell.mahacet.org या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल MHT Merit List 2021 कशी करायची गुणवत्ता यादी डाऊनलोड? - महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे अधिकृत संकेतस्थळ cetcell.mahacet.org वर जा. - आता होमपेजवरील 'Undergraduate Courses’सेक्शनमध्ये जा आणि ‘B.Tech/B.E’ पर्याय निवडा. - आता एक नवी विंडो उघडेल. तेथे ‘MHT CET Provisional Merit List 2021’(हा पर्याय निवडा. हा पर्याय लवकरच अॅक्टिवेट होईल) - गुणवत्ता यादी पाहा आणि डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटआऊट घेऊन ठेवा. नवे कोर्स कोणते? काही महाविद्यालये नवनवीन अभ्यासक्रम सुरू करत आहेत. यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, सायबर सिक्युरिटी आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आदींचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्यावी.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cPl3kS
via IFTTT

Post a Comment

0 Comments