CBSE: प्रॅक्टीकल परीक्षांसाठी सीबीएसईने दिला 'हा' पर्याय

CBSE: करोना साथीमुळे गेल्या दोन शैक्षणिक वर्षांमध्ये शिकवणी आणि परीक्षेशी संबंधित कामांना विलंब होताना दिसतोय. याचा थेट परीणाम विद्यार्थ्यांचा निकाल आणि पुढील शैक्षणिक वर्षावर पडताना दिसतोय. या पार्श्वभूमीवरनववी आणि दहावीच्या देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने काही पर्याय जाहीर केले आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने () यासंदर्भात परिपत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांशी समोरासमोर संवाद साधण्यासाठी कमी वेळ उपलब्ध आहे. अशावेळी 'शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक कार्या'ला बोर्डाने पर्याय निर्माण केला आहे. याानुसार विद्यार्थी आपले प्रॅक्टीकल वर्क घरी असलेल्या वस्तुंचा वापर करुन पूर्ण करु शकणार आहेत. CBSE बोर्डातर्फे इयत्ता नववी आणि इयत्ता दहावीच्या प्रॅक्टीकल वर्कसाठी परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.२०२१-२२ या शैक्षणिक वर्षात यामध्ये इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळांमध्ये प्रयोगांसाठी लागणाऱ्या सामानासाठी हे नोटिफिकेशन आहे. सीबीएसईने आपल्या परिपत्रकात NCERT लॅब मॅन्युअलमधून नववी आणि दहावीच्या आधारे तयार केलेल्या प्रॅक्टीकल वर्कची यादी देखील जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या संकल्पना एक्सप्लोर करण्यासाठी आणि अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी याचा वापर होऊ शकतो. मंडळाच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांची निरीक्षणे रेकॉर्ड करण्यासाठी या प्रॅक्टीकल वर्कसह स्टेप बाय स्टेप गाइड, व्हिडीओ आणि वर्कशीटचा उपयोग केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी या मटेरियल पॅकेज पर्यायांसह प्रत्येक प्रयोगासाठी लागणाऱ्या साहित्याच्या यादीचा समावेश करण्यात आला आहे. हे साहित्य थिंकटेकद्वारे देण्यात आले असून दिक्षा पोर्टलवर देखील उपलब्ध आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CR4z7d
via IFTTT

Post a Comment

0 Comments