DU guidelines: आता कॉलेजांमध्ये रॅगिंग करणाऱ्यांची खैर नाही, कठोर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

DU guidelines: दिल्ली विद्यापीठातील पदवीच्या पहिल्या वर्षाचे ऑफलाइन वर्ग २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली विद्यापीठ रॅगिंग अधिक आक्रमक पाऊले उचलताना दिसत आहे. दिल्लीतील कॉलेज सुरू होण्यापूर्वीच विद्यापीठातर्फे रॅगिंगविरोधात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. यासोबतच मुख्याध्यापक कार्यालयासमोर सीलबंद तक्रार पेटी लावण्यात आली असून, एक पथक देखील तयार करण्यात आले आहे. रॅगिंग करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर पाऊले उचलली जाणार आहेत. जात, लिंग, धर्माच्या आधारावर कोणत्याही विद्यार्थ्याचा छळ होऊ नये, कोणत्याही विद्यार्थ्यासोबत अशा घटना घडणार नाहीत याची विशेष काळजी पथकाला घ्यावी लागणार आहे. अशी कोणतीही घटना समोर आल्यास याप्रकरणी दंडात्मक कारवाईही केली जाणार आहे. मिरांडा हाऊस २० नोव्हेंबर रोजी नवीन विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित महाविद्यालये आणि विभागांशी ओळख करून देण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने ओरिएंटेशन डे साजरा करणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना कॉलेजची व्हर्च्युअल टूरही दिली जाईल. श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स, इंद्रप्रस्थ कॉलेज फॉर वुमन, गार्गी कॉलेज आणि रामानुजन कॉलेज २२ नोव्हेंबर रोजी ओरिएंटेशनचे आयोजन करणार आहेत. भास्कराचार्य कॉलेज ऑफ अप्लाइड सायन्सेसचा दीक्षांत समारंभ २० नोव्हेंबरला होणार आहे. फ्रेशर्ससाठी विभाग स्वतःचे स्वतंत्र ओरिएंटेशन कार्यक्रम देखील आयोजित केला जाणार आहे. हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने आयोजित केला जातील आणि वर्ग व्हर्च्युअल मोडमध्ये देखील आयोजित केले जातील. अँटी-रॅगिंग मार्गदर्शक तत्त्वांनुसार संस्थांचे प्रमुख हे प्रत्येक कॉलेज, वसतिगृह, हॉल, विभागामध्ये एक शिस्तबद्ध संसाधन व्यक्ती (DRP) व्यक्तीची निवड करु शकतात. आणि मदतीसाठी त्याचा नंबर इतरांना देऊ शकतात. २२ नोव्हेंबरपासून वर्ग सुरू पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार प्रथम वर्षाच्या यूजी अभ्यासक्रमाचे वर्ग २२ नोव्हेंबरपासून सुरू होतील. ११ मार्च ते २० मार्च २०२२ या कालावधीत फर्स्ट ब्रेक आणि प्रॅक्टीकल सत्रे होणार आहेत. विद्यार्थी अधिकृत वेबसाइट du.ac.in वर त्यांचे वेळापत्रक तपासू शकतात. दिल्ली विद्यापीठाने यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. पहिल्या सत्राच्या परीक्षा २१ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या कालावधीत घेतल्या जातील. पहिल्या वर्षाच्या दुसऱ्या सत्राचे वर्ग ७ एप्रिल २०२२ पासून सुरू होतील. पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी, प्रथम वर्षाचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू होतील आणि प्राथमिक सुट्टी २० मार्चपासून सुरू होईल आणि २९ मार्च २०२२ रोजी संपेल. पहिल्या सत्राच्या परीक्षा ३० मार्चपासून सुरू होतील आणि १२ एप्रिल २०२२ रोजी संपतील. तर दुसऱ्या सत्राच्या पीजी अभ्यासक्रमाचे वर्ग १६ एप्रिल २०२२ पासून सुरू होणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FvRO2J
via IFTTT

Post a Comment

0 Comments