Also visit www.atgnews.com
NEET UG Counselling 2021: मेडिकल काऊन्सेलिंग कमिटीच्या महत्त्वाच्या सूचना
2021: नीट 2021 निकालाच्या घोषणेनंतर आता लवकरच देशभर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी काऊन्सेलिंग प्रक्रिया सुरू होईल. परीक्षेत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांनी या प्रक्रियेत सामील व्हायचे आहे, त्यांना त्यांच्या रँकनुसार, मेडिकल कॉलेज आणि कोर्स मिळेल. याच दरम्यान एमसीसी म्हणजेच मेडिकल काऊन्सेलिंग कमिटीने (Medical Counselling Committee, ) ने या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एक महत्त्वाची अॅडव्हायजरी जारी केली आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना बनावट एजंटसंबंधी सावध केले आहे. कमिटीने विद्यार्थ्यांना सावध करत सांगितले आहे की, प्रवेश पूर्णपणे योग्यतेच्या आधारावरच होतील, अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भरलेल्या पसंतीक्रमांनुसार कॉलेज अलॉट होतील. एमसीसीने उमेदवारांना हेदेखील सूचित केले आहे की एमसीसीची अधिकृत वेबसाइट https://ift.tt/3mAzMFR व्यतिरिक्त कोणत्याही अन्य वेबसाइट द्वारे कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने कोणत्याही बनावट संकेतस्थळांपासून सावध व्हा. एमसीसीद्वारे जारी अधिकृत नोटीस मध्ये म्हटले आहे की MCC नामांकनाच्या आधारे जागावाटप करत नाही. या व्यतिरिक्त, डीजीएचएसच्या एमसीसी द्वारे यशस्वी विद्यार्थ्यांना कोणतेही पत्र जारी केलं जात नाही, ज्या उमेदवारांना एमसीसी द्वारे जागा वाटप झालं आहे, त्यांना एमसीसीच्या वेबसाइटद्वारे प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर डाऊनलोड करावं लागेल आणि प्रवेश निश्चितीसाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा लागेल. उमेदवारांना हा सल्ला दिला जातो की जागा वाटप प्रक्रियेदरम्यान सतर्क राहा. आपला पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर कोणासोबतही शेअर करू नका. कारण त्यामुळे काऊन्सेलिंग प्रक्रियेत बाधा येऊ शकते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cuCZ3Y
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments