Also visit www.atgnews.com
HPCL मध्ये पदवीधारकांना नोकरीची संधी, २५ हजारपर्यंत मिळेल पगार
HPCL : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई येथे (, HPCL) मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. याअंतर्गत पदवीधर प्रशिक्षणार्थींना (Graduate Apprentice) एचपीसीएलमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. सिव्हील इंजिनीअरिंग, मॅकेनिकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रीकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग, इंस्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग या ब्रांचसाठी ही भरती होणार आहे. त्यामुळे उमेदवारांकडे संबंधित विषयाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. उमेदवारांना ६० टक्के पेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे. ओबीसी/एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांना ५० टक्केपेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. पदवीधर प्रशिक्षणार्थी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २५ हजार रुपय पगार देण्यात येईल. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय १८ वर्षांपेक्षा कमी नसावे आणि २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून थेट मुलाखतीच्या माध्यमातून त्यांची निवड होणार आहे. इंजिनीअरिंग डिग्रीच्या शैक्षणिक निकालाआधारे ऑल इंडिया मेरीट लिस्ट तयार केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना मेडिकल टेस्टसाठी बोलावण्यात येईल. उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत आणणे गरजेचे आहे. ६ डिसेंबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. दिलेल्या मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nR6tQ1
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments