Also visit www.atgnews.com
JEE Advanced २०२३ परीक्षेच्या अभ्यासक्रमात मोठा बदल
2023: जेईई अॅडव्हान्स्ड (JEE Advanced )परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. या परीक्षेच्या अभ्यासक्रमात मोठा बदल करण्यात आला आहे. आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेसाठी सुधारीत अभ्यासक्रम देण्यात आला आहे. या अंतर्गत परीक्षेत भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry) आणि गणित (Maths) या विषयांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. आता जेईई अॅडव्हान्स्ड २०२३ परीक्षा नवीन अभ्यासक्रमाच्या आधारे घेतली जाणार आहे. सुधारित अभ्यासक्रमाशी संबंधित तपशीलवार माहिती अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. २०२३ मध्ये होणाऱ्या परीक्षेला बसणारे विद्यार्थी वेबसाइटवर जाऊन अभ्यासक्रमातील बदल पाहू शकतात. सुधारित भौतिकशास्त्राच्या अभ्यासक्रमानुसार, न्यूटनचा गतीचा नियम (Law of Motion), स्थिर आणि गतिमान घर्षण (static and dynamic friction), कार्य आणि शक्ती (Work And Power), गुरुत्वाकर्षणाचा नियम (Law of gravity), गुरुत्वाकर्षण क्षमता (gravitational potential)आणि क्षेत्र, केप्लरचा नियम (area, Kepler's law)यांचा समावेश आहे. याशिवाय, रसायनशास्त्राच्या अभ्यासक्रमातील सामान्य विभागात अणू आणि रेणूंच्या संकल्पना, डाल्टनचा अणू सिद्धांत, मोल संकल्पना, रासायनिक सूत्रे, संतुलित रासायनिक समीकरणे इ. तर गणित विभागात संच, संबंध आणि कार्ये, बीजगणित आणि वॅक्टर यांचा समावेश होतो. त्यात मॅट्रिक्सचाही समावेश आहे. याशिवाय, तिन्ही विषयांमधील बदलांशी संबंधित आवश्यक तपशील अधिकृत नोटीसमध्ये तपासता येणार आहेत. JEE Advanced २०२३: जेईई सुधारित अभ्यासक्रम असा डाउनलोड करा JEE सुधारित अभ्यासक्रम डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in ला भेट द्या. त्यानंतर होमपेजवर, 'रिवाइज्ड अभ्यासक्रम जेईई अॅडव्हान्स्ड २०२३' या लिंकवर क्लिक करा.आता सुधारित अभ्यासक्रम तपासा. त्यानंतर उमेदवारांनी ' जेईई (अॅडव्हान्स्ड २०२३) मधून सुधारित अभ्यासक्रम मिळविण्यासाठी येथे क्लिक करा" वर क्लिक करावे. स्क्रीनवर अभ्यासक्रम पीडीएफ दिसेल ती डाऊनलोड करा. भविष्यातील उपयोगासाठी सुधारित अभ्यासक्रमाची प्रिंट घ्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CL2Nnf
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments